समर्थन आणि धोरण आणि गैरवर्तन जबाबदाऱ्यांमध्ये आणखी बदल

आम्ही आमच्या समिती-संवाद आणि नियम आणि तक्रारनिवारण समित्यांच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे संतुलित करण्यावर काम करत असल्याने, आम्ही आणखी दोन प्रकारचे मुद्दे नियम आणि तक्रारनिवारण वरून समिती-संवादच्या आदेशाकडे हलवत आहोत:

रसिकवारसदार

अमच्या दिल्लेल्या हा एक पर्याय आहे की तुमचा मृत्यू झाल्यास किंवा अक्षम झाल्यास, तुमचा नियुक्त केलेल्या व्यक्तीस, तुमचे खाते व्यवस्थापित करण्यास अनुमती देतो. रसिकवारसदार प्रोग्रामबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, तुम्ही ह्या विषयावर आमचे नियम आणि ध्येयधोरणे वाविप्र वाचू शकता. कृपया लक्षात घ्या की तुमच्याकडे सध्या प्रक्रियेत असलेल्या रसिकवारसदार विनंती असल्यास, आमची धोरण आणि गैरवर्तन कार्यसंघ त्यांना आधीच प्राप्त झालेली विनंती पूर्ण करेल.

पुढे जाऊन, तुम्हाला रसिकवारसदार सेट करायचा असल्यास, किंवा सध्या असलेल्या एखादे बदलणे किंवा सक्रिय करणे आवश्यक असल्यास, कृपया समिती-संवाद समितींशी संपर्क साधा.

दुहेरी प्रत

कधीकधी, त्रुटी किंवा त्रुटीमुळे, एखादे काम अनेक वेळा पोस्ट केले जाऊ शकते. हे आमच्या समिती-संवाद समितीला कळवले जाऊ शकते, जे तपास करतील आणि अचूक दुहेरी प्रत काढून टाकतील. कृपया लक्षात ठेवा की ज्या कामांमध्ये भिन्न सामग्री आहे (जसे की एखादे काम जे दुसर्‍या कामाची संपादित किंवा पुनर्लिखित आवृत्ती आहे) अचूक दुहेरी प्रत मानले जाणार नाही.

तुम्ही एकमेकांच्या अचूक नक्कल असलेल्या कामांचा अहवाल देऊ इच्छित असल्यास, कृपया आमच्या समिती-संवाद समितीला तुमच्या अहवालात दोन्ही किंवा सर्व प्रश्नातील दुवे समाविष्ट करा. आम्हाला आशा आहे की हे बदल आमच्या नियम आणि तक्रारनिवारण समिती सदस्यांना त्यांचा अधिक वेळ आणि शक्ती इतर समस्यांसाठी खर्च करण्यास अनुमती देऊन उपयुक्त ठरतील!


OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ पहा.

Announcement, Archive of Our Own

Comments are closed.