रसिक-मुक्तद्वार प्रकल्प २०१२ पासून १०१ संग्रहांचे बाहेरून आयात पूर्ण केल्याचे साजरा करत आहे!

Open Doors (रसिक मुक्तद्वार प्रकल्प) ला जाहीर करण्यात आनंद होत आहे की २०२३ मध्ये आम्ही ११ संग्रह बाहेरून आयात करण्याचे प्रकल्प पूर्ण केले आहे, एकूण १०,००० पेक्षा जास्त कलाकृत्या! आम्हाला आशा आहे की आपल्याला आपले जूने व नवे आवडते कृत्या खाली दिलेल्या संकलनाच्या यादी मध्ये मिळतील.

रसिक मुक्तद्वार प्रकल्प २०१२ पासून धोक्यात असलेले रसिककृती संग्रह आयात करत आहे, त्याची सुरुवात स्माॅलविल समलिंगी जोडी संग्रह पासून झाली. अलिकडच्या प्रकल्पांमुळे आमची एकूण संख्या १०१ ला पोचली! शंभरावा संग्रह गॅम्बीट गिल्ड फोरमचे लबो लायब्ररी होते.


अ प्रीस्ट ईन कोरिया

संपूर्ण झाले: जानेवारी २०२३

सुजन लाइनबाख ने M*A*S*H (आयोलांथी या नावाखाली) व स्टार ट्रेक अश्या अनेक रसिकगटात रसिककला आणि रसिककृत्या बनवल्या. दुर्दैवाने जून २००६ मधे सुजनचा देहांत झाला. तिच्या जवळच्या नातेवाईकांनी क्वऱ्डल नावाच्या संग्रहकाला सुजनच्या M*A*S*H रसिककृत्यांना जतन करायची परवानगी दिली. या रसिककृत्या सुजनने मुळात अ प्रीस्ट ईन कोरिया वेबसाईट वर आयोलांथी या टोपणनावाखाली प्रकाशित केल्या होत्या.

आयोलांथी_स्मारक Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) खाता येथे आपल्याला या कृत्या मिळतील.

संग्रह आणि त्याच्या Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) वर हलवण्या बद्दल आणखीन माहिती साठी, अ प्रीस्ट ईन कोरिया आयात घोषणा संग्रहाचा इतिहास वाचण्यासाठी किंवा तुमच्या स्वतःच्या काही गोष्टी वाटायला, सुजन लाइनबाख आणि अ प्रीस्ट ईन कोरिया हे फॅनलोर पृष्ठ बघा.


ड्रॅगनफेथ

संपूर्ण झाले: फेब्रुवारी २०२३

ड्रॅगनफेथ हे एक यु-गी-ओह! रसिककथा संग्रह आहे जे अंझू माझाकी आणि सेतो काईबा च्या जोडीला निष्ठ आहे.

ड्रॅगनफेथ संकलनमधे आपल्याला या कृत्या मिळतील.

संग्रह आणि त्याच्या Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) वर हलवण्या बद्दल आणखीन माहिती साठी, ड्रॅगनफैथ आयात घोषणाt बघा. संग्रहाचा इतिहास वाचण्यासाठी किंवा तुमच्या स्वतःच्या काही गोष्टी वाटायला, ड्रॅगनफेथ फॅनलोर पृष्ठबघा.


लॉर्ड ऑफ द रिंग्ज फॅनफिकशन

संपूर्ण झालं: फेब्रुवारी २०२३

लॉर्ड ऑफ द रिंग्ज फॅनफिकशन हे एक लॉर्ड ऑफ द रिंग्ज पुस्तके व चित्रपटांनी प्रेरित रसिककृत्यांचा संग्रह होता. या संग्रहात मिश्रकथा, लॉर्ड ऑफ द रिंग्ज वाव्यक आणि समलिंगी जोडींसाठी भाग असूनही त्याचा मूळ भार मूळकथेवर आधारित मिश्रलिंगी जोडी कथांवर होता. २००४ मधे अडोरा ने स्थापित केलेला संग्रह शेवटी क्वीन मॅब च्या ताब्यात देण्यात आला ज्यांच्या रसिक मुक्तद्वार प्रकल्पाबरोबरच्या सहकार्यामुळे तेथील कृत्या AO3 वर आणण्यात आल्या.

लॉर्ड ऑफ द रिंग्ज फॅनफिकशन संकलन मधे आपल्याला या कृत्या मिळतील. संग्रह आणि त्याच्या Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) वर हलवण्या बद्दल आणखीन माहिती साठी, लॉर्ड ऑफ द रिंग्ज फॅनफिकशन आयात घोषणा बघा. संग्रहाचा इतिहास वाचण्यासाठी किंवा तुमच्या स्वतःच्या काही गोष्टी वाटायला, लॉर्ड ऑफ द रिंग्ज फॅनफिकशन फॅनलोर पृष्ठ बघा.


व्हिगॉरली सीक्रेट सॅन्टा

संपूर्ण झालं: मे २०२३

व्हिगॉरली सीक्रेट सॅन्टा, एक वार्षिक Lord of the Rings (लॉर्ड ऑफ द रिंग्स) समलिंगी वाव्यक रसिककथा भेटींची देवाणघेवाण जी विगगो मॉर्टेन्सन/ऑर्लॅंडो ब्लूम ह्यांच्या नात्यावर भर देते, २०२० पासून AO3 वर चालत आहे. लाईव्हजर्नल आणि ड्रीमविड्थ वरील सर्व जुनी कार्ये (२००४-२०१९) एकत्रित करण्यासाठी संपादकाने ठरवले आहे कि हि कार्ये सुद्धा AO3 वर स्थलांतरित करायची.

व्हिगॉरली सीक्रेट सॅन्टा देवाणघेवाण संकलन मधे आपल्याला या कृत्या मिळतील.

संग्रह आणि त्याच्या Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) वर हलवण्या बद्दल आणखीन माहिती साठी, व्हिगॉरली सीक्रेट सॅन्टा आयात घोषणा बघा. संग्रहाचा इतिहास वाचण्यासाठी किंवा तुमच्या स्वतःच्या काही गोष्टी वाटायला, व्हिगॉरली एक्समस फॅनलोर पृष्ठ बघा.


ऑफपॅनेल.नेट

संपूर्ण झालं: सेप्टेंबर २०२३

ऑफपॅनेल.नेट एक सुपरहीरो चित्रकथांवर भर देणारा ऑनलाईन संग्रह होता जो १९९९ ते २०१६ चालला ज्यात साधारणतः १५ निर्मात्यांच्या कृत्या अलिप्त मुखपृष्ठांवर दाखवायचा. त्यांचा ब्रीद “Where 4-Color Doodles Do Off-Color Things” (जिथे चाररंगी रेघोट्या असभ्य गोष्टी करतात) असूनही कार्य सर्व प्रकारचे व गुणांकणाचे होते.

ऑफपॅनेल.नेट संकलन मधे आपल्याला या कृत्या मिळतील.

संग्रहाचा इतिहास वाचण्यासाठी किंवा तुमच्या स्वतःच्या काही गोष्टी वाटायला, ऑफपॅनेल.नेट फॅनलोर पृष्ठ बघा.


वीर/मॅकके रसिककथा संग्रह

संपूर्ण झालं: सेप्टेंबर २०२३

वीर/मॅकके रसिककथा संग्रह एक स्टारगेट अटलांटिस मधल्या रॉडनी मॅकके आणि एलिझाबेथ वीर च्या जोडीवर रसिककथांचा संग्रह होता. तो २००६ मधे स्थापित केला गेला आणि २०१५ पर्यंत चालू राहीला, जेव्हा संस्थापक पर्पलयिन यांना राखता आला नाही आणि ती साईट बंद झाली.

वीर/मॅकके रसिककथा संग्रह संकलन मधे आपल्याला या कृत्या मिळतील.

संग्रह आणि त्याच्या Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) वर हलवण्या बद्दल आणखीन माहिती साठी, वीर/मॅकके रसिककथा संग्रह आयात घोषणा बघा. संग्रहाचा इतिहास वाचण्यासाठी किंवा तुमच्या स्वतःच्या काही गोष्टी वाटायला, वीर/मॅकके रसिककथा संग्रहफॅनलोर पृष्ठ बघा.


एकोस फ्रॉम द वेस्ट

संपूर्ण झालं: ऑक्टोबर २०२३

एकोस फ्रॉम द वेस्ट एक साईयुकी रसिककथा संग्रह होता. मूळ पालनकर्ताला जेव्हा सांभाळणे अशक्य झालं तेव्हा ती साईट बंद करून संग्रह AO3ला स्थलांतरित करण्यात आला.

एकोस फ्रॉम द वेस्ट संकलन मधे आपल्याला या कृत्या मिळतील.

संग्रह आणि त्याच्या Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) वर हलवण्या बद्दल आणखीन माहिती साठी, एकोस फ्रॉम द वेस्ट आयात घोषणा बघा. संग्रहाचा इतिहास वाचण्यासाठी किंवा तुमच्या स्वतःच्या काही गोष्टी वाटायला, एकोस फ्रॉम द वेस्ट फॅनलोर पृष्ठ बघा.


द एआरसी

संपूर्ण झालं: नोव्हेंबर २०२३

द एआरसी एक प्राईमईवाल रसिककथा संग्रह होता जो २००८ ते २०१४ ऑनलाईन होस्ट केला जात होता, पण त्यानंतर संस्थापक त्याला राखू शकले नाहीत आणि ती साईट बंद झाली.

द एआरसी संकलन मधे आपल्याला या कृत्या मिळतील.
संग्रह आणि त्याच्या Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) वर हलवण्या बद्दल आणखीन माहिती साठी, द एआरसी आयात घोषणा बघा. संग्रहाचा इतिहास वाचण्यासाठी किंवा तुमच्या स्वतःच्या काही गोष्टी वाटायला, द एआरसी फॅनलोर पृष्ठ बघा.


व्हॉट मेक्स द डेझर्ट बीयूटीफूल

संपूर्ण झालं: नोव्हेंबर २०२३
व्हॉट मेक्स द डेझर्ट बीयूटीफूल हा एक सीएसआय: क्राईम सीन इनव्हेस्टीगेशन रसिककथा संग्रह होता ज्याचा भार निक आणि ग्रेग या समलिंगी जोडीवर होता आणि जो २००४ ते २०१७ चालला.

व्हॉट मेक्स द डेझर्ट बीयूटीफूल मधे आपल्याला या कृत्या मिळतील.

संग्रह आणि त्याच्या Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) वर हलवण्या बद्दल आणखीन माहिती साठी, व्हॉट मेक्स द डेझर्ट बीयूटीफूल आयात घोषणा बघा. संग्रहाचा इतिहास वाचण्यासाठी किंवा तुमच्या स्वतःच्या काही गोष्टी वाटायला, व्हॉट मेक्स द डेझर्ट बीयूटीफूल फॅनलोर पृष्ठ बघा.


लबो लायब्ररी

गॅम्बीट गिल्ड चर्चापिठाचे लबो लायब्ररी एक २००६ ते २०१० मधे चालणारे एक्स मेन रसिककथा संग्रह होते, ज्याचा भार रेमी लबो किंवा “गॅम्बीट” या व्यक्तिरेखेवर होता.

लबो लायब्ररी संकलन मधे आपल्याला या कृत्या मिळतील.

संग्रह आणि त्याच्या Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) वर हलवण्या बद्दल आणखीन माहिती साठी, लबो लायब्ररी आयात घोषणा बघा. संग्रहाचा इतिहास वाचण्यासाठी किंवा तुमच्या स्वतःच्या काही गोष्टी वाटायला, गॅम्बीट गिल्ड फॅनलोर पृष्ठ बघा.


द लायब्ररी ऑफ मोरिया

संपूर्ण झालं: डिसेंबर २०२३

द लायब्ररी ऑफ मोरिया हा संग्रह लॉर्ड ऑफ द रिंग्स: द फेलोशिप ऑफ द रिंग सिनेमात आल्यानंतर लवकरच २००२ मध्ये स्थापित झाला. तो लॉर्ड ऑफ द रिंग्स साठीच्या पहिल्या ऑनलाईन संग्रहांपैकी एक होता! त्या वेळेच्या इतर टोलकिन संग्रह पासून त्याचा निराळापणा म्हणजे त्याचा भार चित्रपटावर आधारित समलिंगी जोडी रसिककथांवर होता.पण त्याचा आटोका आणि त्याची लोकप्रियता पटकन वाढली. AO3 संकलन खुले आहे व सर्व टोलकिन च्या कार्यावर आधारित समलिंगी, कोणीही वाचा व समलिंगी वाव्यक कथा स्वीकारते.

लायब्ररी ऑफ मोरिया संकलन मधे आपल्याला या कृत्या मिळतील.

संग्रह आणि त्याच्या Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) वर हलवण्या बद्दल आणखीन माहिती साठी, द लायब्ररी ऑफ मोरिया आयात घोषणा बघा. संग्रहाचा इतिहास वाचण्यासाठी किंवा तुमच्या स्वतःच्या काही गोष्टी वाटायला, लायब्ररी ऑफ मोरिया फॅनलोर पृष्ठ बघा.


ज्यांनी ही आयात शक्य केली अशा सर्व संग्राहकांचे आणि स्वयंसेवकांचे, तसेच त्यांची कामे हस्तांतरित किंवा हक्क सांगणाऱ्या सर्व निर्मात्यांचे आम्ही खूप खूप आभार मानू इच्छितो! आम्ही २०२४ मध्ये आणखी संग्रह आयात करण्यास उत्सुक आहोत.

या पोस्टवर टिप्पणी करणे दोन आठवड्यांनंतर, अक्षम केले जाईल. जर तुम्हाला त्या तारखेनंतर या आयातीबद्दल काही प्रश्न, चिंता किंवा टिप्पण्या असतील तर, कृपया रसिकमुक्तद्वार प्रकल्प समिति ला संपर्क करा.


OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ पहा.

Announcement, Open Doors

Comments are closed.