रसिकमुक्तद्वार प्रकल्प १२ बाहेरच्या संग्रहांचं २०२१ मध्ये आयात होणं साजरा करत आहे!

Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प) ला जाहीर करण्यात आनंद होतं आहे की २०२१ मध्ये आम्ही १२ बाहेरून संग्रह आयात करण्याचे प्रकल्प पूर्ण केले आहेत, एकूण ४,००० पेक्षा जास्त कलाकृत्या! आम्हाला आशा आहे की तुम्हाला तुमचे जूने वं नवे आवडते कार्य खाली दिलेल्या संकलनाच्या यादी मध्ये मिळतील.


डॉयलकोरडी

संपूर्ण झालं: एप्रिल २०२१

डॉयलकोरडी ही एक एंजेल (मालिका) च्या कॉर्डेलिया / डॉयल जोडी वर केंद्रित पत्रव्यवहाराची यादी होती. याहू ग्रुप्स बंद झाल्या नंतर, संपादक जे काही थोडे रसिककार्य वाचवू शकले ते जतन करणे इच्छुक होते. डॉयलकोरडी AO3 संकलन येथे तुम्हाला ते कार्य मिळतील.

संग्रह आणि त्याच्या Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) वर हलवण्या बद्दल आणखीन माहिती साठी, डॉयलकोरडी आयात घोषणाबघा. संग्रहाचा इतिहास वाचण्यासाठी किंवा तुमच्या स्वतःच्या काही गोष्टी वाटायला, डॉयलकोरडी फॅनलोर पृष्ठ हे बघा.

रॉहाइड-फिक

संपूर्ण झालं: जून २०२१

रॉहाइड, १९५९ मधली गुरेढोरे चालवण्या बद्दल एक मालिका, चं रसिकगट छोटं पण टिकाऊ आहे. हे काऱ्यांचं संकलन २००३ पासून चालू झालं, जेव्हा हा रॉहाइड-फिक गट याहू ग्रुप्स वर बनवला गेला. तुम्ही कार्य रॉहाइड-फिक AO3 संकलनवर शोधू शकता.

संग्रह आणि त्याच्या AO3 वर हलवण्या बद्दल आणखीन माहिती साठी, रॉहाइड-फिक आयात घोषणा बघा. संग्रहाचा इतिहास वाचण्यासाठी किंवा तुमच्या स्वतःच्या काही गोष्टी वाटायला, रॉहाइड-फिक फॅनलोर पृष्ठ हे बघा.

फीबोबेफिक संग्रह

संपूर्ण झालं: जून २०२१

पीटर जॅकसन च्या लॉर्ड ऑफ द रिंगस चित्रपटांच्या वेळेस, बाग-एंड-चा-फ्रॉडो-बगीनस (फीबोबे) हे रसिककृत्या मंडळात फ्रॉडो-केंद्रित, दुखापत/दिलासा रसिककृत्या निर्माण करण्यास ओळखले गेले. ती या शैली मध्ये एवढी गुंतवून गेली की तिने एक फ्रॉडोहिलर्स म्हणून याहू ग्रुप बनवला, जिकडे ती फक्त आपले कार्य नाही तर दुसऱ्यांचे पण स्वागत करायची. दुःखाने, तिच्या जुनाट आजारामुळे तिच्या बऱ्याच रसिककृत्या पूर्ण नाही झाल्या, पण ज्या पूर्ण झाल्या त्यांचं संरक्षण करायला, रसिकमुक्तद्वार प्रकल्पानि तिची कामे AO3 च्या एका संकलनात हस्तांतरित करण्यात मदत केली, असे काहीतरी जे तिने एके दिवशी स्वतः करण्याविषयी अनेकदा म्हटले होते. फीबोबेफिक संकलन येथे तुम्ही कार्य शोधू शकता.

संग्रह आणि त्याच्या AO3 वर हलवण्या बद्दल आणखीन माहिती साठी, फीबोबेफिक आयात घोषणा बघा. संग्रहाचा इतिहास वाचण्यासाठी किंवा तुमच्या स्वतःच्या काही गोष्टी वाटायला, बाग एंड चा फ्रॉडो बगीनस फॅनलोर पृष्ठ हे बघा.

सारेक आणि अमांडा संग्रह

संपूर्ण झालं: ऑगस्ट २०२१

सारेक आणि अमांडा संग्रह हे स्टार ट्रेक: द ओरिजिनल मालिका मधल्या सारेक आणि अमांडा च्या जोडी साठी बनवलेल संग्रह होते. मूळ संग्रह, जे shaw.ca वर होतं, ते विरघळलं गेलं, म्हणून पूर्ण संग्रह लेखकांच्या परवानगी सोबत AO3 ला हलवले गेले. सारेक आणि अमांडा संग्रह AO3 संकलन वर तुम्ही कार्य बघू शकता.

संग्रह आणि त्याच्या AO3 वर हलवण्या बद्दल आणखीन माहिती साठी, सारेक आणि अमांडा संग्रह आयात घोषणा बघा. संग्रहाचा इतिहास वाचण्यासाठी किंवा तुमच्या स्वतःच्या काही गोष्टी वाटायला, सारेक आणि अमांडा संग्रह फॅनलोर पृष्ठ हे बघा.

टॉम पॅरिस वसतिगृह

संपूर्ण झालं: सेप्टेंबर २०२१

टॉम पॅरिस वसतिगृह हे स्टार ट्रेक: वोयाजेर मधल्या टॉम पॅरिस या पात्र वर केंद्रित रसिककृत्या साठी बनवलेला होतं. हे संग्रह १९९९ च्या शेवटी ‘थॉमस यूजिन पॅरिस चं अद्भुत जग’ या नावाने बनवलं गेलं होतं. तो उत्तरोत्तर वाढत गेला, आणि १३०० पेक्षा जास्त कार्य सादर करत होता. अखेरीस तीच्या पुरालेखशास्त्रज्ञ, बांशी, ने संग्रह बंद करून आणि त्याच्यावरचे कार्य AO3 वर हलवण्याचा निर्णय घेतला. टॉम पॅरिस वसतिगृह AO3 संकलन वर तुम्ही कार्य बघू शकता.

संग्रह आणि त्याच्या AO3 वर हलवण्या बद्दल आणखीन माहिती साठी,टॉम पॅरिस वसतिगृह आयात घोषणा बघा. संग्रहाचा इतिहास वाचण्यासाठी किंवा तुमच्या स्वतःच्या काही गोष्टी वाटायला, टॉम पॅरिस वसतिगृह फॅनलोर पृष्ठ हे बघा.

हृदयाचे अष्टक: अत्युत्कृष्ट संग्रह

संपूर्ण झालं: सेप्टेंबर २०२१

अत्युत्कृष्ट संग्रह हे बफी आणि एंजेल जोडी च्या रसिककृत्या च्या संकलन साठी बनवलेलं आहे जे क्रीसली ने आपल्या साईट हृदयाचे अष्टक ह्याच्यावर सादर केलं होतं. क्रीसली म्हणते की ती अश्या गोष्टी सादर करते जे तिला ‘विशेषतः सुंदर, किंवा विस्मयकारक (जे ऑक्सफोर्ड इंग्रजी शब्दकोश मध्ये अत्युत्कृष्ट ची व्याख्या आहे)’ वाटले. अत्युत्कृष्ट संग्रहात कार्य मूलतः २००४-२०१२ मध्ये प्रकाशित केले गेले. हृदयाचे अष्टक: अत्युत्कृष्ट संग्रह A03 संकलन वर तुम्ही कार्य शोधू शकता.

संग्रह आणि त्याच्या AO3 वर हलवण्या बद्दल आणखीन माहिती साठी, हृदयाचे अष्टक: अत्युत्कृष्ट संग्रह आणि माला तुझी आठवण येईल मॅरथॉन संग्रह (२००५-२००९) आयात घोषणा बघा. संग्रहाचा इतिहास वाचण्यासाठी किंवा तुमच्या स्वतःच्या काही गोष्टी वाटायला, हृदयाचे अष्टक: अत्युत्कृष्ट संग्रह फॅनलोर पृष्ठ हे बघा.

माला तुझी आठवण येईल मॅरथॉन संग्रह (२००५-२००९)

संपूर्ण झालं: सेप्टेंबर २०२१

माला तुझी आठवण येईल मॅरथॉन संग्रह हे बफी आणि एंजेल च्या जोडी ची माला तुझी आठवण येईल मॅरथॉन, जे २००५ ते २००९ चाललं, साठी लिहलेल्या काऱ्यांच संकलन आहे. लेखक नोवेंबर च्या महिन्याच्या दर दिवशी एक रसिककृती प्रस्तुत करायचे, एंजेल चा १९९९ मधला “माला तुझी आठवण येईल” हा एपिसोड चा वर्धापन दिन साजरा करायला. माला तुझी आठवण येईल AO3 संकलन वर तुम्ही कार्य बघू शकता.

संग्रह आणि त्याच्या AO3 वर हलवण्या बद्दल आणखीन माहिती साठी, हृदयाचे अष्टक: अत्युत्कृष्ट संग्रह आणि माला तुझी आठवण येईल मॅरथॉन संग्रह (२००५-२००९) आयात घोषणा बघा. संग्रहाचा इतिहास वाचण्यासाठी किंवा तुमच्या स्वतःच्या काही गोष्टी वाटायला, माला तुझी आठवण येईल फॅनलोर पृष्ठ हा बघा.

बफी/गाईल्स रसिककृती संग्रह

संपूर्ण झालं: सेप्टेंबर २०२१

बफी/गाइल्स रसिककृती संग्रह हे बफी/गाइल्स जोडीला समर्पित एक मोठे आणि दीर्घकाळ चालणारे बफी द व्हॅम्पायर स्लेअर रसिककृती संग्रह होते. त्याच्या जवळपास १००० कृतींचे आता AO3 वर कायमस्वरूपी घर आहे. बफी/गाइल्स रसिककृती संग्रह AO3 संकलन वर तुम्ही कार्य शोधू शकता.

संग्रह आणि त्याच्या AO3 वर हलवण्या बद्दल आणखीन माहिती साठी, बफी/गाइल्स रसिककृती संग्रह आयात घोषणा बघा. संग्रहाचा इतिहास वाचण्यासाठी किंवा तुमच्या स्वतःच्या काही गोष्टी वाटायला, बफी/गाइल्स रसिककृती संग्रह फॅनलोर पृष्ठ हे बघा.

गिल्मोर मुली प्रौढ फिक

संपूर्ण झालं: ऑक्टोबर २०२१

२००२ पासून २०१६ पर्यंत, गिल्मोर मुली प्रौढ फिक ने लेखकांसाठी त्यांच्या आवडत्या गिलमोर गर्ल्स जोडप्यांबद्दल लिहिण्यासाठी त्या काळातील सर्वात प्रमुख फिक संग्रहाच्या मर्यादेशिवाय एक सुरक्षित ठिकाण बनण्याचा प्रयत्न केला, परंतु संयम आणि योग्य नियम देखील प्रदान केले जेणेकरुन ज्यांना फक्त मिसओजिनिस्टिक कार्य लिहायचे आहे ते स्वागत नव्हते. जरी वेळ निघून गेला आहे आणि याहू ग्रुप्स आता अस्तित्वात नाहीत, तरीही त्यांच्या पात्रांबद्दल अधिक पाहण्याची आवड आणि उत्सुकता दूरचित्रवाणीने परवानगी दिली नाही. गिल्मोर मुली प्रौढ फिक AO3 संकलन वर तुम्ही कार्य बघू शकता.

संग्रह आणि त्याच्या AO3 वर हलवण्या बद्दल आणखीन माहिती साठी, गिल्मोर मुली प्रौढ फिक आयात घोषणा बघा. संग्रहाचा इतिहास वाचण्यासाठी किंवा तुमच्या स्वतःच्या काही गोष्टी वाटायला, गिल्मोर मुली प्रौढ फिक फॅनलोर पृष्ठ हे बघा.

गिल्मोर मुली समलिंगी जोडी

संपूर्ण झालं: नोवेंबर २०२१

२००१ पासून २०१६ पर्यंत, गिल्मोर मुली समलिंगी जोडी ही एक पत्रव्यवहाराची यादी होती ज्यामध्ये गिल्मोर मुली मधील सर्व स्त्रीलिंगी जोड्या आणि समलिंगी जोड्या समाविष्ट होते आणि लॉरेलाई आणि तिचे महिलांसोबतचे विविध फ्लर्टेशनसह रोरी आणि पॅरिसमधील रसायनशास्त्र पाहणाऱ्या लेखकांच्या कथा. या अविश्वसनीय आणि परिपूर्ण स्त्रियांना पाठवणारी रसिकगट नाहीशी झालेली नाही. गिल्मोर मुली समलिंगी जोडी AO3 संकलन वर तुम्ही कार्य बघू शकता.

संग्रह आणि त्याच्या AO3 वर हलवण्या बद्दल आणखीन माहिती साठी, गिल्मोर मुली समलिंगी जोडी आयात घोषणा बघा. संग्रहाचा इतिहास वाचण्यासाठी किंवा तुमच्या स्वतःच्या काही गोष्टी वाटायला, गिल्मोर मुली समलिंगी जोडी फॅनलोर पृष्ठ हे बघा.

स्वप्नांचं देश

संपूर्ण झालं: डिसेंबर २०२१

स्वप्नांचं देश हे अभिनेते ओडेड फेहर आणि त्याने साकारलेल्या पात्रांना समर्पित रसिककृती संग्रह होते. स्वप्नांचं विणकर AO3 संकलन वर तुम्ही कार्य बघू शकता.

संग्रह आणि त्याच्या AO3 वर हलवण्या बद्दल आणखीन माहिती साठी, स्वप्नांचं देश आयात घोषणा बघा. संग्रहाचा इतिहास वाचण्यासाठी किंवा तुमच्या स्वतःच्या काही गोष्टी वाटायला, स्वप्नांचं देश फॅनलोर पृष्ठ हे बघा.

दोनदा चावलेला

संपूर्ण झालं: डिसेंबर २०२१

दोनदा चावलेला हे टीव्ही मालिका ब्लड टाईजवर आधारित कथांसाठी एक रसिककृती संग्रह होते. दोनदा चावलेला AO3 संकलन वर तुम्ही कार्य बघू शकता.

संग्रह आणि त्याच्या AO3 वर हलवण्या बद्दल आणखीन माहिती साठी, दोनदा चावलेला आयात घोषणा बघा. संग्रहाचा इतिहास वाचण्यासाठी किंवा तुमच्या स्वतःच्या काही गोष्टी वाटायला, दोनदा चावलेला फॅनलोर पृष्ठ हे बघा.


ज्यांनी ही आयात शक्य केली अशा सर्व अभिलेखशास्त्रज्ञांना आणि स्वयंसेवकांना, तसेच त्यांची कामे हस्तांतरित किंवा हक्क सांगणाऱ्या सर्व निर्मात्यांना आम्ही खूप मोठा धन्यवाद देऊ इच्छितो! आम्ही २०२२ मध्ये आणखी संग्रह आयात करण्यास उत्सुक आहोत.

या पोस्टवर टिप्पणी करणे दोन आठवड्यांनंतर, ११ फेब्रुवारी रोजी अक्षम केले जाईल. जर तुम्हाला त्या तारखेनंतर या आयातीबद्दल काही प्रश्न, चिंता किंवा टिप्पण्या असतील तर, कृपया रसिकमुक्तद्वार प्रकल्प समिति ला संपर्क करा.


OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ पहा.

Announcement, Open Doors

Comments are closed.