माझं मुंगूस AO3 मध्ये स्थलांतरण करीत आहे

माझं मुंगूस रसिक-मासिक

माझं मुंगूस, एक सेंटीनेल रसिक कार्य आणि रसिक कला इ-मासिक संकलन संग्रह, Archive of Our Own – AO3 (आमचा स्वत:चा संग्रह) मध्ये स्थलांतरण करीत आहोत.

या पोस्ट मध्ये:

पार्श्वभूमीसंदर्भात स्पष्टीकरण

माझं मुंगूस इ-मासिक वरती असलेल्या सर्व कथा, कला आणि विवध कृत्या एकत्र करण्याच्या प्रयत्नात, त्याच्या निर्माता आणि नियंत्रक नि आमचा स्वतःचा संग्रह मध्ये सगळ्या कृत्या ठेवण्याचं निश्चय घेतला आहे.

Open Doors (रसिक-मुक्तद्वार) AO3 वर माझं मुंगूस इ-मासिक वेगळे, शोध घेता येण्याजोगे संकलन ने यांच्यामध्ये स्थलांतरित करण्यासाठी लिसा बरोबर काम करेल. संग्रह पूर्णपणे जतन करण्यासाठी, सर्व रसिक कथा व रसिक कला सध्यस्थितीत OTW’s (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळीच्या) मुख्य संगणकावर होस्ट केल्या जातील, व त्यांच्या स्वतःच्या AO3 कार्य पृष्ठांवर अंतर्भूत केल्या जातील.

आम्ही माझं मुंगूस इ-मासिक मधून कार्य AO3 वर स्थलांतरित करणे जानेवरी नंतर चालू करणार आहोत.

ज्या निर्मात्यांची कार्य या माझं मुंगूस इ-मासिक मध्ये आहेत/होती त्यांच्या दृष्टीने ह्याचे महत्व काय?

प्रत्येक निर्मात्याचा आमच्याकडे जो ई-मेल पत्ता आहे त्यावर आम्ही स्थलांतरण सूचना पाठवू. स्थलांतरण करण्याआधी कुठल्याही कार्यांच्या सध्य-स्थित प्रति शोधण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू. जर आम्हाला AO3 वरती आधीच एखादी प्रत सापडली तर आम्ही ती स्थलांतरित करण्याऐवजी संकलनामध्ये निमंत्रित करू. सर्व कार्य जी निर्मात्याच्या वतीने संग्रहित केली जातील त्यांच्यामध्ये त्यांची नावे उपशीर्षकामध्ये किंवा कार्याच्या सारांशामध्ये सामील केलेली असतील.

सर्व स्थलांतरित कार्य लॉग-इन केलेल्या वापरकर्त्यांनाच फक्त दृश्य असतील. एकदा आपण आपली कार्य प्रतिपादित केलीत, की आपल्याला हवे असल्यास आपण त्यांना सार्वजनिकपणे दृश्य करू शकाल. ३० दिवसांनंतर, सर्व अप्रतिपादित कार्य सर्व पाहुण्यांना दृश्य होतील.

कृपया, रसिक-मुक्तद्वारास संपर्क करा आपल्या माझं मुंगूस इ-मासिक स्यूडोआयडी आणि ई-मेल पत्त्या सह, जर:

  1. आपली कार्य आम्ही स्थलांतरित करावयाची असतील, पण आपल्याला सूचना मूळ संग्रह च्या सोबत असलेला ई-मेल पत्ता सोडून इतर कुठल्या पत्त्यावर पाठवून हव्या असतील
  2. जर आपल्याकडे आधीच AO3 खाते असेल व आपण आपली कार्य स्वतःच स्थलांतरित केली असतील.
  3. आपल्याला आपली कार्य स्वतः स्थलांतरित करावयाची असतील (जर अजून आपले AO3 खाते नसेल तर तेही सामील करून).
  4. आपल्याला आपली कार्य AO3 वर स्थलांतरित करावयाची नसतील.
  5. जर आपण आम्ही आपली कार्य AO3 वर करणे पसंत असेल पण आपले नाव आपल्याला काढायचे असेल.
  6. जर आम्ही मदत करू शकू अशी आपल्याला इतर काही शंका असेल.

आपल्या ई-मेल च्या विषयामध्ये कृपया आपल्या संग्रहाचे नाव घाला. जर आपल्या माझं मुंगूस इ-मासिक खात्याशी जुडलेल्या ई-मेल खात्यावर आपल्या जाता येत नसेल, तर कृपयारसिक-मुक्तद्वारास संपर्क करा आणि आम्ही आपल्याला सहाय्य करू. (जर आपण कार्य इतर कोठे पोस्ट केली असतील, किंवा सोप्या मार्गाने ती आपलीच आहेत याची खात्री करू शकत असाल, तर उत्तम; जर तसे नसल्यास, आम्ही माझं मुंगूस इ-मासिक व्यवस्थापकांसोबत काम करून आपल्या प्रतिपादनाची खात्री करू.)

अजूनही आपल्या काही शंका असतील…

आपल्याला अजूनही काही शंका असतील, तर रसिक-मुक्तद्वार वाविप्र, किंवा रसिक-मुक्तद्वार समितीस संपर्क करा यांना भेट द्या.

आम्हाला आवडेल जर रसिकांनी आम्हाला माझं मुंगूस फॅनलोर ची गोष्ट जतन करावयासही मदत केली तर. जर आपण विकी संपादनामध्ये नवीन असाल, तर काळजी करू नका! टिपांसाठी, नवीन दर्शक प्रवेशद्वार हे बघा किंवा फॅनलोर गार्डनर्स यांना विचारा.

आम्ही माझं मुंगूस जतन करण्यासाठी खूप उत्साहित आहोत!

– रसिक-मुक्तद्वार संघ आणि लिसा

OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ पहा.

Open Doors

Comments are closed.