फ्रांचेसका कॉपा ने म्हंटलेल्या पाच गोष्टी

ह्या महिन्यात OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) १५ वर्षांचे होत आहे!

ह्या उत्सवाचा भाग म्हणून, आम्ही एक खास ५ गोष्टी पोस्ट प्रकाशित करत आहोत आमच्या एका संस्थापकांसोबत, फ्रांचेसका कॉपा. ह्या पोस्ट मध्ये आपण OTW च्या सुरवातीच्या दिवसांबद्दल फ्रांचेसका च्या आठवणी आणि तेव्हापासून मंडळाने सामोरे गेलेल्या आव्हानांबद्दल वाचू शकता. आम्ही एक त्रिविआ स्पर्धा (फक्त इंग्रजीत उपलब्ध) आणि एक रसिककृती आव्हान सुद्धा होस्ट करत आहोत. आणखी माहिती साठी, कृपया OTW च्या वर्धापनदिनाच्या पोस्ट च्या इंग्रजी प्रतिरूपाला भेट द्या.


साधारण दर महिन्याला OTW च्या एका स्वयंसेवकाबरोबर मंडळातील त्यांच्या अनुभवांबद्दल
Q&A केला जाईल. ह्या पोस्ट्स मध्ये प्रत्येक स्वयंसेवकाची स्वतःची मते मांडली जातात आणि असे जरुरीचे नाही कि ती मते OTW ची मते किंवा धोरणे मांडतात.

तुम्ही जे स्वयंसेवक म्हणून काम केले आहे ते OTW च्या कामात कसे बसते?

२००७ मध्ये सुरु केल्या पासून मी बऱ्याच भूमिका निभावल्या आहेत. आम्ही एक मंडळ स्थापित करायच्या आधी त्या अनेक रसिकांना एकत्र आण्याची माझी जबाबदारी होती ज्यांनी घोषित केले होते कि ते स्वयंसेवक बनू इच्छितात. मग ५ वर्ष मी बोर्ड वर होते, त्यादरम्यान मी जनसंपर्क केले, Open Doors (रसिक-मुक्तद्वार प्रकल्प) स्थापित करायला मदत केली, आणि रसिकफिती आणि इतर माध्यमांसाठी समिती वर काम केले.

आम्ही जेव्हा वापरकर्त्यांच्या Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) च्या अनुभवाचे संकल्पन करत होतो तेव्हा मला संग्रहाच्या वायरफ्रेमस चा मागोवा घेण्याची जबाबदारी दिली गेली; ते मजेदार काम होते आणि माझ्या नेहमीच्या कौशल्याच्या बाहेरचे होते!आजकाल मी जास्त शैक्षणिक आणि कायदेविषयक बाजूवर काम करते; मी तर्क लिहिते (उ. मी डॉ. सुस/स्टार ट्रेक खाटल्यावर काम केले), आणि कायदेविषयक समिती ला लागेल तेव्हा साक्ष देते, आणि मी Transformative Works and Cultures – TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) वर सुद्धा काम करते, संशोधन शोधण्यासाठी आणि परीक्षण करण्यासाठी. जनसंपर्क समितीलाही माहिती आहे कि त्यांना लागला तर मी आहे, आणि मी अजूनही मुलाखती देते आणि पत्रकारांना रसिकगटांबद्दल पार्श्वभूमी देते म्हणजे त्यांना त्या दिशेने माहिती असेल. (पण आता बरेच पत्रकार स्वतः रसिक आहेत आणि त्याची खूप मदत होते!)

एक स्वयंसेवक म्हणून आता तुमचा प्रातिनिधिक आठवडा कसा असतो?

मी जे काम करते ते ऋतूप्रमाणे बदलणारे ahe, आठवड्याने नाही. ने दर वर्षाला दोन (आणि कधी कधी तीन!) पीयर-रीव्हयू केलेले अंक काढने सुरु ठेवले आहे, जे अविश्वसनीय आहे; जसे मी कायम सांगत आले आहे, विद्यापीठाने अनुदानित केलेली अशी बरीच जर्नल आहेत ज्यांच्या कडे पगारी कर्मचारी आहेत ज्यांचा सुद्धा असा ट्रॅक रेकॉर्ड नाहीये! बारिश जर्नल फक्त दोन एक वर्ष टाकतात आणि मग बंद होतात, पण आम्ही अजून खंबीर आहोत. शैक्षणिक आणि कायदेविषयक बाजू खूप मुदतीवर केंद्रित आहे; गोष्टी घडत जातात आणि त्वरित उत्तरे द्यावी लागतात. (आश्चर्यकारक कायदेविषयक समिती, जी कायम खात्री करते कि आम्हाला प्रभावित करणाऱ्या सर्व कायदेविषयक बाबींमध्ये आमचा आवाज ऐकू येईल, साठी शाऊट आऊट.)

जेव्हा तुम्ही OTW च्या सुरवातीच्या काळाबद्दल विचार करता तेव्हा तुम्हाला OTW च्या सध्याच्या स्थितीबद्दल सर्वात आश्चर्यकारक काय वाटते?

कि असे लोक आहेत—आमच्यावर प्रेम करणारे लोक सुद्धा—ज्यांना हे लक्षात येत नाही कि OTW एक रसिक प्रकल्प आहे, व्यवसाय नाही! कि हे मंडळ अश्या एका रसिकांच्या गटाने शिजवलेला प्रकल्प आहे ज्यांना बाजारी वृत्तीमुले फसवले जाण्याचा कंटाळा आला होता! मला वाटतं आता खरंच बऱ्याच रसिकांना भांड्वलदारापुर्वीच इंटरनेट आठवत नसाव; ते अस गृहीत धरतात कि वेब वरच काहीही व्यवसायच असतो. आणि OTW चे बिगर नफ्याचे उदाहरण काहींसाठी गोंधळात टाकणारे असू शकते—कारण रसिकगट ते चालवण्यासाठी पैसे देते पण सगळे देत नाहीत.

OTW निधी उभारते कारण ज्यांना पैसे देता येतात ते ज्यांना देता येत नाहीत त्यांना आधार देऊ शकतात, सार्वजनिक टीव्ही किंवा रेडिओ च्या प्रकल्पावर आधारित, आणि सर्वजण आमचे प्रकल्प वापरू शकतात त्यांना परवडते आहे किंवा नाही ह्याची पर्वा न करता. पण मला वाटतं असे खरंच लोक आहेत ज्यांना प्रामाणिकपणे ह्यावर विश्वास बसत नाही कि एवढ मोठ आणि यशस्वी काहीतरी (आणि मला म्हणायचंय पूर्ण OTW, फक्त AO3 नाही पण TWC आणि कायदेविषयक समिती सुद्धा, जी एमिकस ब्रीफ्स लिहिते आणि एक प्रमुख संस्था म्हणून ज्याला सरकारने ओळख दिली आहे ई.) बाजारपेठेच्या बाहेर काम करू शकत. आम्ही सर्वर साठी पैसे देतो (आणि ते आमच्या स्वतःचे आहेत), पण बोर्ड पासून पूर्ण खाली रसिकगट श्रम दान करतो. आणि खरा सांगायचं तर हे श्रमच अनमोल आहेत, फक्त आर्थिकदृष्ट्या नाही (जरी आर्थिकदृष्ट्या असले तरी) पण रसिकगट जी भावनाप्रवण गुंतवणूक करतो मंडळामध्ये
त्या दृष्टीने. OTW अशी संस्था आहे जी अस्तित्वात आणण्यासाठी बऱ्याच लोकांनी इच्छा व्यक्त केली आणि काम केले; ती आम्ही बांधलेली नौका आहे आणि ती चालते कारण नवीन लोक ती चालवण्यासाठी पुढाकार घेऊन काम करत राहतात.

OTW मध्ये तुमच्या सिद्धी पद्दल तुम्हाला सगळ्यात जास्त अभिमान कसला आहे?

माझ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव जेव्हा त्यांना कळते कि मी च्या स्थापनेत सहभागी होते. अचानक, त्यांच्यासाठी मी एक रॉकस्टार बनते! त्या सगळ्यांकडे AO3 ची खाती आहेत. मला असा भूतकाळ आठवतोय जेव्हा मी चिंता करायचे कि लोकांना माझ्या रसिकगटातल्या गुंतवणुकीबद्दल कळेल, आणि आता माझे कॉलेज हे एक वैशिष्ठ्य म्हणून प्रकाशित करते: AO3 ला ह्यूगो अवॉर्ड मिळाले आहे!

OTW च्या विस्तारात कोणती गोष्ट (किंवा गोष्टी) सगळ्यात आव्हानात्मक ठरल्या आहेत?

ओह…आव्हाने आधी हि होती आणि आता हि आहेत. जेव्हा श्रम दान केलेले असतात तेव्हा काय करणे गरजेचे आहे आणि लोकांना काय करायला आवडते, काय करायचे आहे, आणि काय चांगले करता येते ह्यात तणाव हा होतोच. आणि ह्यात काही आश्चर्याचे नाहीये कि बऱ्याच लोकांना ते ज्या कसबी रोजच्या कामात वापरतात त्या वापरायच्या नसतात; त्यांना कामातून ब्रेक हवा असतो! पण एक जुनी महान आहे कि एक माळी मजेसाठी पियानो वाजवतो आणि एक पियानोवादक बाग फुलवतो. मला नेहमी वाटत आले आहे कि रसिकगट सुद्धा तसाच असतो, आणि OTW सुद्धा.

OTW चा संघ जे करतो, ज्या प्रकारे इतकी लोक उपस्थित राहतात आणि काम करतात, त्यामुळे मी मनापासून प्रभावित आहे. मला वाटतं कि अश्या एका संस्थेमध्ये ज्यात कोणालाच पगार मिळत नाही त्यात कौशल्य आणि प्रतिसादशक्ती फारच आश्चर्यकारक आहे. आणि रसिकगटाला सुद्धा हे माहित आहे—माझ्या मते आम्ही बहुतेक, सगळ्या नाही तरी, नफ्यासाठी काम करणाऱ्या संस्थांपेक्षा चांगले आहोत, आणि बहुतेक नफ्यासाठी ना काम करणाऱ्या संस्थांपेक्षा जास्त व्यावसायिक आहोत. (पण आम्ही परिपूर्ण नाही आहोत, नक्कीच नाही, पण जी लोक तक्रार करतात ते हे कधीच सांगत नाहीत कि आमच्याहून चांगला काम कोण करतय, कारण कोणीच ते करत नाहीये; काही समस्या कठीण समस्याच असतात.)

तरीही, कारण आता आम्ही इतके मोठे झालोय, जेव्हा मी भविष्याचा विचार करते… माझ्या मते आमच्यासाठी पुढची पायरी आम्ही करतोय त्याहून “थोडे” पैसे अजून उभे करणे नाहीये, पण आणखी खूप पैसे, म्हणजे एका वेगळ्या पातळीवर पैसे उभे करणे हि आहे. म्हणजे (आपल्यापैकी काही वाचकांना हे कळेल) जर कोणी आपल्याला विचारले कि आपल्याला वाढदिवसाला काय हवे आहे, आणि आपण म्हणता “काही नाही” पण आपल्याला खरेतर असे म्हणायचे असते कि “काहींनाही जे तुम्ही मला वाढदिवसाला देऊ शकता—मला एका काउच ची गरज आहे. मला घर पुन्हा रंगवून हवय. मला गाडी साठी नवीन ट्रान्समीशन हवे आहे.”

आणि जरी आम्ही त्या स्थलावर पैसे उभारू शकलो, तरी जसे महान सिंडी लौपर समजूतदारपाने म्हणाल्या होत्या “पैश्यामुळे सगळं बदलत.” जर असे बनवले ज्यात पगारी कामगार असतील ज्यांना आदेश देऊन कामे केली जाऊ शकतील, तर ते ह्या प्रकारचे मंडळ राहणार नाही. त्यामुळे मला माहित नाही, पण आत्तापर्यंत आम्ही खूप खूप चांगले केले आहे कोणत्याही वाजवी छंदोबध्दच्या मते (ती म्हणते प्रखर अभिमानाने) आणि अजून काही कारण नाहीये कि ज्यामुळे आम्ही ते पुढे करू शकणार नाही. रसिकगट पुनःकल्पित करते, पुनःनिर्मित करते, आणि शोध लावते; हेच आमचे काम आहे!

तुम्हाला कोणत्या रसिक गोष्टी करायला आवडतात?

खरंतर रसिकगट हि जास्त एक जागा आहे ज्यात मी राहते आणि कमी एक गोष्ट जी इ करते; मी इथेच स्थापित झाले आणि इथेच राहतेय आता, एक ४० वर्षांपासून? हे माझे नगर आहे! रसिक माझे शेजारी आहेत, आणि त्यातल्या बऱ्याच जणांना मी दशकांपासून ओळखतेय, आणि कधी कधी नवीन लोक राहायला येतात आणि दुसरे सोडून जातात. त्यामुळे, मला म्हणायचंय—हो, नक्कीच, मी अजूनही रसिककथा वाचते आणि लिहिते आणि बीटा करते, आणि मला आवडणाऱ्या रसिकगटांमध्ये मी रसिकचित्रफीते बघते, पण मला असे हि वाटते कि मी रसिकगटाची एक नागरिक आहे, माझ्या पुढच्या पोर्च वर बसलेली, मी बघत असते काय चालू आहे पण नेहमी काम मला करावे लागत नाही. मला म्हणायचंय कि मी रस घेते; मला जाणून घ्यायचे आहे कि मोठे रसिकगट कोणते आहेत, मला विनोद समजून घ्यायचे आहेत, भाषा बोलायची आहे: मला सर्व सारांश ओळखायचे आहेत जरी मी त्या शोज ची रसिक नसले तरी.

पण मी टिकटॉक कडे थांबणारे मला वाटतं. (हम्म … पण मी हे आधी सुद्धा बोलले आहे, त्यामुळे, तुम्हाला जसे माहिती आहे: कधी नाही म्हणायचे नाही.)


आता आमच्या स्वयंसेवकाने त्या काय करतात त्याबद्दल पाच गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्यामुळे आता आपली वेळ आहे त्यांना आणखी एक गोष्ट विचारायची! त्यांच्या कामाबद्दल टिप्पणण्यांमध्ये विचारायला संकोचू नका. किंवा जर तुम्हाला हवे असेल तर आदले पाच गोष्टी पोस्ट्स बघा.


OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठपहा.

Five Things

Comments are closed.