
आपण सर्वांनीच आपल्या स्वतःच्या मूळ-कथा उभ्या केल्या आहेत – आपल्याला आवडणाऱ्या कथा, रसिकचित्राफिते, रसिककला, आणि इतर कार्ये ज्यांच्या कडे आपण वारंवार परत जातो. जानेवारी मध्ये आम्ही तुम्हाला ह्या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय रस्किकृती दिनाचा (किंवा इंग्रजीत थोडक्यात IFD, त्याचे लघुनाम) विषय सांगितला, जो आहे “श्रेष्ठ रसिक कार्य,” आणि आम्ही तुम्हाला सांगितले कि तुमच्या मते जी रसिक-कार्ये वाचणे, बघणे किंवा ऐकणे अस्त्यावश्यक आहेत अशी कार्य जमवायला सुरुवात करा.
आता ती वेळ आली आहे, आणि आम्हाला हे बघायला आवडेल कि तुम्ही कोणती कार्ये गोळा केली आहेत! ह्या नोंदी मध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या रसिकगटातील तुमच्या मते श्रेष्ठ असलेली कार्य शेयर करू शकता. ही अशी कार्य असू शकतात ज्यांनी त्यांचे स्वतःचे रसिक गट प्रेरित केले आहेय, किंवा अशी कार्ये ज्यांनी तुम्हाला प्रेरित केले आहे, किंवा अशी कार्ये ज्यांनी तुम्हाला मूळ कथेला एका नव्या नजरेतून बघण्यास भाग पडले आहे – तुम्हाला जशी व्याख्या करायची असेल तशी करू शकता!
भाग घेण्यासाठी, खाली फक्त एका टिपण्णीद्वारे अश्या रसिककार्याचा तपशील शेयर करा जे तुमच्या मते आम्ही चुकवले न जावेत. कार्याची दूवा त्यात सामील करायला विसरू नका, आणि आम्हाला जरूर सांगा की ते कार्य तुमच्यामते रसिकगटामध्ये श्रेष्ठ का आहे (तुम्हाला पसंत असेल, तर तुम्ही #IFD2022 हॅशटॅग बरोबर नोंद केलेल्या एखाद्या शिफारशीच्या नोंदीची दूवा सुद्धा सामील करू शकता).
अर्थातच, त्या कार्यांच्या निर्मात्यांची सुद्धा यथायोग्य प्रशंसा केली पाहिजे, त्यामुळे जेव्हा तुम्ही ती दुवा घेण्यासाठी जाल, तेव्हा त्यांना का नाही सांगत कि तुम्हाला त्यांचे कार्य किती आवडते? दुसऱ्या सहभाग्यांचे प्रस्ताव सुद्धा बघायला विसरू नका – तुम्हाला कदाचित तुमच्या स्वतःच्या मूळ कथेत सामील करायला आणखी काहीतरी आवडते मिळेल.
ह्या सर्वाचा आनंद घ्या!
OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ पहा.