तुम्ही आता ईमेलद्वारे OTW बातम्यांची सदस्यता घेऊ शकता

जरी OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) बातम्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे बघितल्या जाऊ शकतात, आज आम्ही एका अतिरिक्त पर्याय बद्दल घोषणा करू इच्छितो. तुमच्या इनबॉक्समध्ये OTW बातम्या पोहोचवण्यासाठी तुम्ही आता सदस्यता घेऊ शकता. ही सेवा वाचकांच्या सोयीसाठी आणि रसिकांच्या अनुभवामध्ये येणाऱ्या समस्यांसाठी, जसे की Instagram पोस्टमध्ये लिंक जोडण्यास असमर्थता, अल्गोरिदम च्या खेळांमुळे किंवा व्यस्त दिवसांमुळे गहाळ बातम्या पत्र किंवा आम्ही पोस्ट करत असलेल्या सोशल मीडिया साइट्सचा (किंवा कोणत्याही सोशल मीडियाचा) वापर न करणे, निरसन म्हणून ऑफर केली जात आहे.

ईमेलद्वारे OTW बातम्या सेवा विनामूल्य आणि एकाधिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. दुव्यावर अधिक माहिती आहे, परंतु कृपया खालील गोष्टींचे देखील पुनरावलोकन करा:

  1. सर्व OTW बातम्या अनुवादित केल्या जात नाहीत आणि पोस्ट अनुवादित केल्या गेल्या तरीही त्या प्रत्येक भाषेत उपलब्ध नसतील. तुम्हाला प्रत्येक महिन्याला सर्व बातम्यांच्या पत्राची प्रत प्राप्त करायची असल्यास, कृपया तुमच्या पसंतीच्या भाषांव्यतिरिक्त इंग्रजी निवडा.
  2. इंग्रजीसह, सध्या १६ भाषा उपलब्ध आहेत आणि भविष्यात आणखी जोडल्या जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास आम्ही OTW वृत्तपत्र मध्ये याची घोषणा करू.
  3. वितरणाचे तीन प्रकार आहेत. मूलभूतानुसार प्रत्येकजण आपात्कालीन संदेशांसाठी नोंदले जातील (तरी तुम्ही सदस्यता घेण्यापूर्वी तो पर्याय अनचेक करू शकता).
  4. सरासरी, इंग्रजीतील OTW बातम्या पत्र दर आठवड्यात ३ वेळा प्रकाशित होतात. तुम्हाला जर तुमच्या इनबॉक्समध्ये कमी ईमेल्स हव्या असल्यास, Digest (संग्रह) पर्याय निवडा जो तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या शेवटी एकदा त्या महिन्याच्या सर्व पोस्टच्या सारांश आणि दुवासह ईमेल करेल.
  5. तुम्ही जर व्यक्तिगत बातमी पत्र सदस्यता घेतली असल्यास, पोस्ट सार्वजनिक झाल्यानंतर काही तासांत तुम्ही निवडलेल्या प्रत्येक भाषेसाठी पोस्ट तुम्हाला प्राप्त होतील. प्रत्येक भाषेतील पोस्टची वेळ ते पोस्ट केलेल्या क्रमानुसार बदलू शकतात.

तुम्हाला नोंद करताना समस्या आल्यास, कृपया खालील तपासा:

  1. तुम्ही तुमचे नोंद पर्याय निवडल्यानंतर आणि नोंद करा या बटन वर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला तुमचा पत्ता सत्यापित करण्यासाठी ईमेल प्राप्त झाला होता? (टीप: तुम्ही सदस्यता घेतल्यावर तुम्हाला वेबपृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल, परंतु तेथे असलेले बटण तुमच्या सदस्यतेची पुष्टी करणार नाही.) संदेश मिळणे सुरू करण्यासाठी तुम्हाला पाठवलेल्या ईमेलमधील दुव्यावर क्लिक करणे आवश्यक आहे.
  2. तुम्ही तुमचा पत्ता सत्यापित केल्यानंतर तुम्हाला पुष्टीकरण ईमेल प्राप्त झाला? नसल्यास, तुम्ही पुन्हा सदस्यता घेण्याचा प्रयत्न करू शकता.
  3. पोस्ट निघून अनेक तास झाले असल्यास आणि व्यक्तिगत बातम्यांच्या पत्राचे सदस्यत्व घेतल्यानंतरही तुम्हाला त्याची प्रत मिळाली नसल्यास, तुमचे कचरा फोल्डर तपासा. किंवा, तुम्ही Gmail वापरत असल्यास, तुमचे सोशल फोल्डर. आमचे ईमेल कचरा नाही म्हणून चिन्हांकित केल्याची खात्री करा.
  4. तुम्हाला तुमच्या इनबॉक्समध्ये मेसेज येत आहेत पण आता ते कचरा फोल्डरमध्ये येत आहेत? ईमेल नियमितपणे उघडण्याचे सुनिश्चित करा, जरी तुम्ही ते वाचले नाही. बऱ्याच ईमेल सेवा तुमच्या वागणुकीला प्रतिसाद देतात आणि जर तुम्हाला एखाद्या विशिष्ट पत्त्यावरून ईमेल प्राप्त होत असतील परंतु ते कधीही उघडत नसाल तर प्रेषक तुम्हाला कचरा ईमेल पाठवत आहे असे समजेल.

जर तुम्ही वरील दिलेल्या गोष्टी तपासल्या आहेत, आणि तुमची समस्या अजूनही चालू आहे, तर तुम्ही आपल्या बातम्या वितरण च्या समस्यानिवारण मध्ये मदतीसाठी जनसंपर्क समितीला संपर्क करू शकता.

जर तुम्हाला ईमेल द्वारे OTW बातम्या ही सेवा आवडली असेल, तर कृपया इतर रसिकांना ह्या पर्याया बद्दल सांगा ज्याच्यानी ते OTW क्रियाकलाप आणि विषयांची माहिती जाणू शकतात!


OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ पहा.

Announcement

Comments are closed.