जुन्या सदस्यांसाठी नवीन OTW भेटींचे सादरीकरण

शेवटच्या ॲाक्टोबर सदस्यता ड्राईव्ह च्या वेळी, आम्ही घोषणा केली होती की आम्ही OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) च्या सर्वात निष्ठावंत समर्थकांना साजरे करण्यासाठी एका नवीन मार्गावर काम करित आहोत. आम्ही तीन, पाच व दहा वर्षांच्या सलग सदस्यतेच्या उत्सवासाठी रचना केलेल्या नवीन निवडक भेटी आपल्याला दाखवण्यास आनंद होत आहे!

२०२० च्या अंताला जे कमीतकमी ३ वर्ष सदस्य आहेत असे सर्व जण या निमित्त खास बनवलेली नवीन वाचनखूण मिळण्यास प्राप्त आहेत:

 "३-वर्ष सदस्य" आणि OTW लोगोसह शिलालेख असलेले बुकमार्क.
(मोठे करण्यासाठी प्रतिमा निवडा)

आमच्या पाच-वर्षांच्या सदस्यांसाठी, आम्ही एक खूप छान स्टिकर बनवले आहे जे, पाण्याच्या बाटल्यांपासून लॅपटाॅप पर्यंत विविध गोष्टींच्या पृष्ठभागांवर जाऊ शकते. जर आपण पाच वर्ष सदस्य असाल, तर आपण स्टिकर व वाचनखूण प्राप्त करण्यासाठी पात्र आहात!

"परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळीचे ५-वर्षाचे सदस्य" आणि मध्यभागी असलेल्या OTW लोगोसह शिलालेख असलेले स्टिकर.
(मोठे करण्यासाठी प्रतिमा निवडा)

व सरतेशेवटी, दहा वर्षांच्या सदस्यतेची खूण म्हणून, आमच्याकडे आपल्या फ्रिज किंवा कुठल्याही धातूच्या कपाटासाठी उत्तम असे लोहचुंबक आहे. अर्थातच, कोणीही जे इतक्या काळासाठी सदस्य आहेत त्यांना एका वेळी तीन भेटी प्राप्त होऊ शकतात!

"१० वर्षांसाठी परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळीचे सदस्य" आणि OTW लोगोसह शिलालेख असलेले चुंबक.
(मोठे करण्यासाठी प्रतिमा निवडा)

आम्ही नवीन वर्षीच्या सुरुवातीला जे २०२० च्या अंताला पात्र आहेत त्यांना या भेटी पाठवण्यास चालु करू, व त्यापुढे वर्षातून एकदा करू. भेट प्राप्त करण्यासाठी आपल्याला फक्त आपला पत्ता पुष्टीकृत करायचा आहे! जेव्हा जेव्हा आपण भेट प्राप्त करण्यासाठी पात्र असाल, आम्ही आपल्याला एक ईमेल पाठवू जी आपला पत्ता पक्का करण्यास विचारेल, म्हणून कृपया आपल्या इनबाॅक्स वर लक्ष ठेवा! (जर आपण OTW कडून मेल येणे निवडले नसेल तर कदाचित आपल्याला ही ईमेल व आपली भेट प्राप्त होणार नाही. आपल्याला काही प्रश्न असतील तर कृपया अर्थपुरवठा व सदस्यता समितीशी संपर्क करा.)

OTW चे काम आपल्या देणगी मुळे शक्य झाले आहे, व आम्ही आमच्या सर्व सदस्यांचे मनापासून कौतुक करतो, आपण एकदा देणगी दिलेली असो किंवा आपण सुरुवातीपासून पाठिंबा देत असाल. जर आपल्याला सदस्य बनायचे असेल तर आपल्याला फक्त “Yes” (होय) निवडायचे आहे देणगी फाॅर्म वरच्या या प्रश्नाचे उत्तर म्हणून “Do you want to be an OTW member? ($10 minimum donation)” (आपल्याला OTW चे सदस्य बनायचे आहे का? (कमीतकमी $१० देणगी)) जेव्हा आपण देणगी द्या हे करता USD$१० किंवा जास्त ची. आमच्या कौतुकाचे प्रदर्शन म्हणून उत्सवी भेटी सोडून, OTW ची सदस्यता आपणांस OTW च्या अध्यक्ष बोर्डाच्या निवडणुकांमध्ये मतदान करण्यास पात्र बनवते! आपण किती वर्ष सदस्य आहात याची आपल्याला खात्री नसेल किंवा आपल्याला आणखी काही प्रश्न असतील तर, कृपया अर्थपुरवठा व सदस्यता समितीशी संपर्क करा.


OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी,भाषांतर पृष्ठ पहा.

Announcement

Comments are closed.