कचरा संरक्षण उपाय

२१ एप्रिल २०२४ रोजी अपमानास्पद कचरा टिप्पण्यांमुळे, आम्ही Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) मधील सर्व अतिथी टिप्पण्या तात्पुरत्या अक्षम केल्या आहेत. आम्ही आता अतिथी टिप्पण्या देण्याची क्षमता पुन्हा-सक्षम केली आहे, परंतु तुम्ही खात्यात लॉग्ड इन नसताना टिप्पणी दील्यास, तुम्हाला एक पडताळणी पृष्ठ आढळू शकतो, जे तुम्ही बॉट आहात की नाही हे तपासेल. आम्ही कचरा कमी करण्यात मदत करण्यासाठी इतर मार्गांवर देखील काम करत आहोत, ज्यात लवकरच आणल्या जाणाऱ्या कृती प्रकाशन फॉर्मवरील मूलभूत टिप्पणी सेटिंग्समध्ये एक छोटासा बदल समाविष्ट आहे.

तुम्हाला प्राप्त झालेल्या कचऱ्याबद्दल काय करावे

जर तुम्हाला थोडेसेच कचरा टिप्पण्या मिळाल्या असतील, तर तुम्ही त्या टिप्पणीच्या तळाशी उजवीकडे असलेलं “Spam” (कचरा) बटण वापरून टिप्पण्यांना कचरा म्हणून चिन्हांकित करू शकता. हे आमच्या कचरा बंदीकरला टिप्पण्या कचरा म्हणून ओळखण्यासाठी प्रशिक्षित करण्यात मदत करते.

जर तुम्हाला एकावेळी शेकडो कचरा टिप्पण्या मिळाल्या असतील — एवढ्या की त्या सर्व तुम्ही स्वतः काढू शकत नाही — तर तुम्हीआमच्या नियम आणि तक्रारनिवारण समिती ला संपर्क करा जेणेकरुन ते कचरा टिप्पण्या मोठ्या प्रमाणात काढून टाकण्यात मदत करू शकतील. कृपया तुमचे वापरकर्तानाव आणि/किंवा कोणत्याही प्रभावित कामांचे दुवे समाविष्ट करा.

कचरा टिप्पण्यांबद्दल अधिक माहितीसाठी, कृपया आमच्या वाविप्र मध्ये “कचरा टिप्पणी म्हणजे काय? मी कचऱ्याबद्दल काय करू शकते?” हे पहा.

तुमच्या कृतींवर कचरा कसे प्रतिबंधित करायचे

खूप सारे कचरा टिप्पण्या अतिथींद्वारे सोडल्या जातात. त्यामुळे तुम्ही तुमच्या आधी प्रकाशित केलेल्या कृतींवर अतिथी टिप्पण्या अक्षम करून कचरा प्रतिबंधित करू शकता.

 • हे एका कृतीसाठी करण्यासाठी, Edit Work (कृती संपादन) पृष्ठावर जावे. तिथे Privacy (गोपनीयता) या विभागात, “Only registered users can comment” (फक्त नोंदणीकृत वापरकर्ते टिप्पणी देऊ शकतात) हा पर्याय निवडा. मग तुम्ही केलेले बदल जतन करायला “Post Without Preview” (पूर्वावलोकन न करता प्रकाशित करा) बटण निवडा, किंवा “Preview” (पूर्वावलोकन) बटण निवडून आणि मग “Update” (अद्यायवत करा) बटण निवडा.
 • तुम्ही आपल्या कृतींचे टिप्पणी सेटिंग्स एक एक करून बदलण्या एवजी एकाच वेळी अनेक कृतींचे सेटिंग्स पटकन बदलू शकता.

  तुमच्या Works (रसिककृती) पृष्ठावर, जर तुम्ही डेस्कटॉप वर असाल तर पृष्ठाच्या उजव्या बाजुला वरती (किंवा मोबाइल वर असल्यास # of Works (कृतींची संख्या) ह्याच्या खालती) “Edit Works” (रसिककृती संपादन) बटण निवडा. हे तुम्हाला Edit Multiple Works (एकाहून जास्त रसिककृती संपादन) ह्या पृष्ठावर घेऊन जाईल. तुमच्या सर्व कृती येथे सूचीबद्ध आहेत, रसिकगटानुसार गटबद्ध केलेले. तुम्हाला जी कृती संपादित करायची आहे त्याच्या समोर दिलेल्या रकान्यावर खूण द्या. जर तुम्हाला आपल्या सर्व कृती संपादित करायच्या असतील तर तुम्ही “All” (सर्व) बटण निवडू शकता, जे “Edit Works” (रसिककृती संपादन) बटणाच्या खाली असेल. जर तुम्हाला आपल्या खूणा मिटवायच्या असतील तर त्याच जागेवर असलेले “None” (कोणतेही नाही) बटण निवडा. तुमचे कृती निवडून झाल्यावर, पृष्ठाच्या वर किंवा खाली असलेल्या “Edit” (संपादन) बटण निवडा.

  गोपनीयता विभागात,”Only registered users can comment” हा पर्याय निवडा. मग आपल्या सर्व निवडलेल्या कृतींना बदलायला “Update All Works” (सर्व रसिककृत्या अद्ययावत करा) हे निवडा.

  एकाहून जास्त कृतींना अद्यायवत कसं करायचं ह्याच्याबद्दल आणखीन माहिती साठी, आमच्या वाविप्र मध्ये “मी एक वेळेस एकाहून जास्त कृतींना कसं अद्ययावत किंवा उडवू शकते?” पहा.

कचऱ्याशी लढण्यासाठी आगामी बदल

येत्या काही दिवसात, आम्ही कृती प्रकाशन फॉर्ममध्ये बदल आणणार आहोत, ज्यामुळे नवीन कृतींवर मूलभूत अनुसार कोण टिप्पणी देऊ शकतय ह्यावर परिणाम होईल. प्रकाशन करण्यापूर्वी किंवा नंतर तुम्ही ही सेटिंग सहजपणे बदलू शकता.

आम्ही सध्या तुमच्या कृतींसाठी विविध गोपनीयता सेटिंग्स देतो, ज्यामध्ये टिप्पणी नियंत्रण सक्षम करण्यासाठी किंवा लॉग इन केलेल्या वापरकर्त्यांपर्यंत तुमची कृती प्रतिबंधित करण्याच्या पर्यायांचा समावेश आहे. तुमच्या कृतीवर कोण टिप्पणी देऊ शकतय हे देखील तुम्ही निवडू शकता:

 • नोंदणीकृत वापरकर्ते आणि अतिथि टिप्पणी देऊ शकतात
 • फक्त नोंदणीकृत वापरकर्ते टिप्पणी देऊ शकतात
 • कोणीही टिप्पणी देऊ शकत नाही

आत्ता, मूलभूत अनुसार “Registered users and guests can comment” (नोंदणीकृत वापरकर्ते आणि अतिथि टिप्पणी देऊ शकतात) निवडले जाते.

आम्ही हे कोड बदल अंमलबजावणी केले की, “फक्त नोंदणीकृत वापरकर्ते टिप्पणी देऊ शकतात” हे मूलभूत निवडणी होईल. जर तुम्ही तुमच्या गोपनीयता सेटिंग्स मध्ये बदल नाही केले तर अतिथि (स्पॅमर आणि बॉट्ससह) तुमच्या कृतींवर टिप्पण्या सोडू नाही शकणार. तुम्हाला अतिथी आणि नोंदणीकृत वापरकर्ते, ह्या दोघांना टिप्पण्या द्याची अनुमती द्यायची असल्यास किंवा तुम्हाला कोणालाही टिप्पण्या द्याची अनुमती द्यायची नसेल तर तुम्ही प्रकाशन करण्यापूर्वी वेगळा पर्याय निवडू शकता.

या बदलामुळे विद्यमान कृती आणि खरडयावरील टिप्पणी सेटिंग्स प्रभावित होणार नाहीत.

आम्हाला आशा आहे की हा बदल कचरा टिप्पण्या आणि निनावी छळाचा सामना करण्यासाठी मदत करण्याचा एक मार्ग असेल आणि आम्ही तुम्हाला तुमच्या गरजेनुसार AO3 तयार करू देणाऱ्या वैशिष्ट्यांवर काम करत राहू.

हा पोस्ट आमच्या स्वयंसेवक मराठी अनुवाद संघाचं कार्य आहे. आमच्याबद्दल अधिक माहितीसाठी, transformativeworks.org वरील भाषांतर पृष्ठ पहा.

Archive of Our Own

Comments are closed.