ऑक्टोबर २०२३ सदस्यता मोहीम: सदस्यत्वाचा अर्थ

जेव्हा जुलैमध्ये DDoS हल्ल्यांमुळे Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह), फॅनलोर आणि आमचा देणगी फॉर्म बंद पडले होते, अनेक रसिकांनी पुढील महिन्यांत देणगी देऊन प्रतिसाद दिला. आपली उदारता आणि या समर्थनाच्या देखाव्यासह हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याची आपली इच्छा या दोन्हीचे आम्ही खूप कौतुक करतो. आम्हाला २०२२ च्या जुलै आणि ऑगस्टच्या तुलनेत २०२३ च्या जुलै आणि ऑगस्टमधे मिळालेल्या देणग्यांमध्ये ३५% वाढ झाली आहे.

म्हणूनच, आमच्या नेहमीच्या ऑक्टोबरच्या सदस्यता मोहिमेदरम्यान, आम्ही आपल्याला OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) – इतर प्रकल्पांसह AO3 आणि फॅनलोर यांच्यामागील ना नफा संस्था, – चे सदस्य होऊन आपला सहभाग चालू ठेवायला प्रोत्साहित करू इच्छितो. म्हणूनच AO3 वरील आमचा मोहीम देणगी बॅनर जमा झालेल्या पैशाच्या ऐवजी नवीन सदस्यांची नोंद करेल .

OTW सदस्यता म्हणजे काय?

आपण US$१० किंवा अधिक देणगी देऊन OTW सदस्य बनू शकता. सदस्यता आपल्याला संचालक मंडळात – म्हणजे OTW च्या प्रशासकीय मंडळामध्ये – सामील होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना मत देण्याचा हक्क देईल. जर आपल्याला पुढील वर्षीच्‍या निवडणुकीमध्ये, जे ऑगस्टमध्‍ये होणार आहे, मतदान करण्‍याची इच्छा असेल तर आपल्याला सदस्‍य होण्‍यासाठी ३० जून २०२४ पर्यंतचा कालावधी आहे.

  • सदस्य बनण्यासाठी, देणगी फॉर्मच्या शेवटी प्रश्नासाठी, “Yes” निवडणे आवश्यक आहे (आपण “हो” निवडणे आवश्यक आहे).
  • आपण US$१ दहा वेळा देणगी देऊन सदस्य होऊ शकत नाही: एक देणगी तरी किमान US$१० असली पाहिजे.
  • नियोक्ता जुळणी सदस्यतासाठी वापरली जाऊ शकत नाही, तरी यू.एस.मधील रसिक आपले योगदान दुप्पट करू शकतात. (हा आपल्यासाठी पर्याय आहे का हे कळण्यासाठी आपल्या एचआर विभागाशी संपर्क साधा!)

OTW सदस्य असणे हे AO3 खाते असण्यासारखे नाही.

आपल्या OTW सदस्यताचा आपल्या AO3 वर असलेल्या कोणत्याही खात्याशी किंवा आमच्या इतर प्रकल्पांशी कोणताही संबंध नाही, आणि OTW सदस्यता आपल्याला कोणत्याही ऑनलाइन जागेवर प्रवेश प्रदान करत नाही. आपला वाचन इतिहास, आपण तयार केलेल्या रसिककृत्या आणि आपण फॅनलोर वर केलेली संपादने आपल्या वॉलेटवरच्या नावाशी किंवा पेमेंट माहितीशी जोडलेली नसावी याची खात्री करण्यासाठी हा OTW ने सुरुवातीपासून मुद्दाम केलेला निर्णय आहे, .

OTW मंडळाच्या निवडणुकांमध्ये मतदान करण्यास सक्षम असण्यासोबतच, आपण सलग अनेक वर्षे सदस्य असल्‍यास आपल्याला छान भेटवस्तू मिळतील.

आणि छान भेटवस्तूंबद्दल बोलतोच आहोत तर, ह्या काही नवीन धन्यवाद-भेटवस्तू आहेत ज्या देणगीदारांना मिळू शकतात :

लाल AO3 लोगो मध्यभागी असलेला आणि लाल पट्टी आणि वरच्या बाजूला राखाडी रेषा असलेली काळी उभे  लेआउट पिन.पांढरे आडवे क्षैतिज लेआउट स्टिकर ज्यात तळाशी डावीकडे AO3 लोगो, त्यावर  आकारात वाढणारी ४ हृदये आणि लाल रंगात  'my fandoms' (माझे रसिकगट) हे शब्द . प्रतिमा ब्रेल लिपीतल्या खालील  शब्दांनी व्यापलेली आहे  'kudos logo/with big hearts/"I [heart]/my fandoms"' (टाळ्यांचा लोगो/मोठ्या हृदया सोबत/मला  [हृदय]/माझे रसिकगट)

AO3 पिन आणि ब्रेल स्टिकर ज्यात “I [heart]/my fandoms” (मला [हृदय]/माझे रसिकगट) लिहिले आहे

या धन्यवाद-भेटवस्तू US$४० पासून सुरू होतात. आपण आवर्ती देणगीची व्यवस्था करू शकता आणि आपल्या आवडीच्या भेटवस्तूसाठी बचत देखील करू शकता. आपल्या देणगी पावतीमध्ये ही व्यवस्था करायच्या सूचना समाविष्ट केल्या जातील.

आणखीन माहिती साठी

जर आपल्याला सदस्यता आणि देणगी बद्दल कोणतेही प्रश्न असतील तर, एकतर आमचे वाविप्र बघा किंवा अर्थपुरवठा आणि सदस्यता समिती ला संपर्क करा.

आम्ही आपल्या सर्व देणग्या, स्वयंसेवा, प्रोत्साहनपर संदेश आणि मजेदार मीम्सची खूप कदर करतो. आणि ज्यांना आमच्या सदस्यता मोहिमेबद्दल माहिती पसरवण्यात मदत करायची आहे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये #otwmembers वापरा! ते आम्हाला आपले संदेश शोधण्यात आणि इतरांना पाठवण्यात मदत करेल.

आपल्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद आणि आम्ही आशा करतो की आपल्यापैकी बरेच जण आमच्यात सामील व्हाल!


OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ पहा.

Event

Comments are closed.