ऑक्टोबर २०२३ सदस्यता मोहीम: नवीन सदस्यांचे स्वागत!

आपली ऑक्टोबर सदस्यता मोहीम आता समाप्त झाली आहे आणि आम्हाला हे जाहीर करण्यात आनंद होत आहे की आपल्याला ६,११३ सदस्य मिळाले आहेत. ७४ देशातून एकूण US$१,९२,७४३.११ वर्गणी मिळाली आहे.

सदस्यता मोहीम आता जरी संपली असेल तरी आपण वर्षातून कधीही सदस्य होऊ शकता. आणि ३० जून, २०२४ रोजी २३:५९ जाप्रवेप्र च्या आधी जर सदस्य झालात, तर आपल्याला आमच्या वार्षिक OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) संचालक मंडळाच्या निवडणूकीत पुढच्या वर्षी ऑगस्ट मधे मत देता येईल.

जशी आमची अर्थपुरवठा आणि सदस्यता समिती आतासुद्धा आपल्या धन्यवाद भेट पाठवण्याच्या कामात व्यस्त आहे तसेच आम्हाला सांगायचे आहे की आपली इतके वर्षांची मदत अतिशय महत्त्वाची होती, ती आर्थिक, स्वयंसेवा किंव्हा आम्हाला प्रोत्साहन देण्याच्या स्वरूपात असो. या वर्षात अनपेक्षित अडचणी आल्या, पण आम्ही खुश आहोत की आपण एकत्र त्या पार केल्या.


OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ पहा.

Event

Comments are closed.