ऑक्टोबर २०२३ वृत्तपत्र, खंड १८३

I. संचालक मंडळ अद्यतन

नवीन संचालक मंडळ खूप काम करत आहेत! त्यांनी एका संघटनात्मक संस्कृती व्यवसाय संस्थेबरोबर करार केला आहे आणि ते लवकरच काम सुरु करतील. हे एक पहिल मोठ पाऊल आहे OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) ची विविधता, इक्विटी, आणि सामाविष्ठता सुधारण्याकडे. मंडळाने मंडळ सहाय्यक टीम समिती च्या पहिल्या अध्यक्षांचीही निवड केली आहे, एक नवीन समिती ची मंडळाला प्रशासकीय आणि स्चेडूलिंग मध्ये साहाय्य करेल.

त्याचबरोबर, संचालक मंडळाने अधिकाऱ्यांच्या मतदानासाठी एक बंद मीटिंग आयोजित केली होती. कृपया आन्ह फाम चे मुख्य-अध्यक्ष म्हणून आणि जिशिन झान्ग चे सचिव म्हणून स्वागत करा. यूएचांग लुओह खजिनदार म्हणून काम करत राहील. अखेरीस, पुढील सार्वजनिक मीटिंग रविवार, नोव्हेंबर १२ ला सकाळी १-२ UTC धरली जाईल. (माझ्यासाठी कोणती वेळ आहे?) संचालक मंडळ हि मीटिंग नीट पार पाडावी म्हणून नेहमीचे रचना आणि नियम थोडे बदलतील; ह्यावर अजून माहिती (इंग्रजी मध्ये) संचालन मंडळ डिस्कॉर्ड सर्वर वर उपलब्ध आहे.

II. ARCHIVE OF OUR OWN – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) मध्ये

Open Doors (रसिकमुकदवार प्रकल्पाने) एक नवीन इम्पोर्ट घोषित केला आहे त्याअंतर्गत रसिक-मासिकातील रसिककृती इम्पोर्ट केल्या जातील AO3 च्या Fanzine Scan Hosting Project (रसिक-मासिक स्कॅन होस्टिंग प्रकल्प) मध्ये. हा प्रकल्प झाइंडम नावाच्या रसिकांच्या चालवलेल्या संरक्षणाच्या प्रकल्पाच्या भागीदारी ने होत आहे. रसिक-मासिक स्कॅन होस्टिंग प्रकल्प मध्ये अजूनही बराच काम बाकी आहे, पण चांगली प्रगती करत आहे, आणि आम्हाला हे बघायला फार आनंद होत आहे कि वाचक ह्या जुन्या रसिक कृतींचे आवर्जून स्वागत करत आहेत! रसिकमुक्तद्वार प्रकल्पाने एकोझ फ्रॉम द वेस्ट, एक डिजिटल साय्युकी रसिककथा संग्रहाचा इम्पोर्ट पूर्ण केला आहे. ऑक्टोबर चा महिना रसिकमुक्तद्वार प्रकल्पासाठी खूप व्यस्तपणाचा गेले आहे, आणि ते अशी आशा करतायत कि ते आपल्याला आणखीन इंपोर्टस ची बातमी लवकरच आंतील.

टाचणखूण समिती साठी ऑक्टोबर एक रोमांचक महिना होता कारण ते नो फॅनडम टाचणखूण प्रक्रियांच्या पहिल्या काही चाचणी परीक्षांसाठी तयारी पूर्ण करत आहेत.
उपलब्धता, आखणी आणि तंत्रज्ञान समिती ने रसिकगटाला पुन्हा नाव देताना ऑटोकॉम्प्लीट च्या प्रक्रियेतले दोष सोडवले आहेत. आणि आणखीन एक खूप स्वागताचा अद्यतन आहे टाचणखूण शोधाच्या प्रक्रियेत, आता टाचणखूण समिती वापराच्या काउन्ट प्रमाणे क्रमवार लावू शकतात. सप्टेंबर मध्ये, टाचणखुण समितीने ६० ,४०० रसिकगटातील ४४९,००० टाचणखुणा सांभाळल्या – प्रत्येक सक्रिय टाचणखुण संपादकाची सरासरी ११०० टाचांखूणांहून जास्त!
सप्टेंबर मध्ये समिती-संवाद समिती ला एकूण २००७ मदतनोंदी आल्या — मागील दोन महिन्यापेक्षा कमी पण तरीही त्यांच्या नेहमीच्या सरासरी पेक्षा जास्त. तसच नियम आणि तक्रारनिवारण समिती ला सप्टेंबर मध्ये २५६० नोंदी आल्या आणि त्यांच्या नवीन भरती झालेल्या स्वयंसेवकांचे खूप स्वागत केले आहे. तांत्रिक व्यवस्था समिती ने
वापरकर्त्यांच्या काही सत्रांबद्दलच्या राहिलेल्या समस्या सोडवण्या साठी समिती-संवाद समिती आणि उपलब्धता, आखणी आणि तंत्रज्ञान समिती बरोबर काम करणे सुरु ठेवले आहे.

III. सदस्यता आणि पोहोच

अर्थपुरवठा आणि सदस्यता समिती ने आपली अर्धवार्षिक सदस्यता मोहीम चालवली, जनसंपर्क समिती आणि भाषांतर समिती बरोबर, ज्यांनी बातमीचे पोस्ट्स २८ भाषांमध्ये भाषांतरित केले. आम्ही ७४ देशांमधील ६,७७३ देणगीदारांनसाठी कृतज्ञ आहोत ज्यांनी US$१९२,७४३.११ च्या देणग्या दिल्या! मोहिमेच्या आधी, अर्थसमितीने देखील OTW च्या २०२३ अर्थसंकल्पावर अपडेट दिला.

आणखीकडे, अर्थपुरवठा आणि सदस्यता समिती चे चेंगदु, चायना येथील वर्ल्ड सायन्स फिक्शन कॉन्व्हेंशन मधले टेबल खूप यशस्वी होते! OTW च्या सोशियल मीडिया वर छायाचित्रे शेयर केले गेले – आपल्या छायाचित्रांमध्ये आम्हाला टॅग करा! आम्हाला अशी अशा आहे कि आपण काही क्युट स्टिकर्स घेतलीत किंवा रसिककलांच्या शिफारसिंची देवाणघेवाण केलीत. आमच्या पुढील साहसी कार्यांसाठी वाट बघा – कदाचित ते आपल्या खूप जवळ असेल 👀

अखेरीस, जनसंपर्क समितीने OTW च्या १६ व्या वर्धापनदिनाच्या सर्वे बद्दल अहवाल प्रकाशित केला, ज्यावर ७८,२५८ प्रतिसाद आले! आपण जर हा सर्वे अहवाल अजून वाचला नसेल तर नक्की वाचा.

IV. OTW मध्ये आणखीकडे

फॅनलोर ने एक ऑडिओ-थिम चा महिना साजरा केला, Podtober, ज्यात रसिकगटांचे पॉडकास्ट, पॉडकास्ट चे रसिकगट. आणि पॉडफिक वर प्रकाशझोत टाकली! त्यांच्या डिस्कॉर्ड सर्वर वर त्यांनी एक मजेदार आणि मैत्रीपूर्ण Podtober-थिम चे संपादन चाट चालवला आणि बाकी महिन्यासाठी त्यांच्या सोशिअल मीडिया वर ऑडिओ-थिम चे लेख दाखवणे चालू ठेवले.

Legal Advocacy (कायदेविषयक मदत) कडे सुद्धा खुश खबर आहे: ऑक्टोबर मध्ये OTW च्या कायदेविषयक समिती ने US सरकारी स्वामित्वा संस्थेला केलेल्या याचिकेला सरकारी स्वामित्व संस्थेने मंजूर केले. हि याचिका डिजिटल मिल्लेनियम कॉपीराईट ऍक्ट मधील वरचढपणा-विरुद्ध तरतुदी साठी रसिकचित्रफीतकारांच्या सुटी ला नूतनीकरीत करण्यासाठी होती.
हि सूट निर्मत्यांना DVDs, Blu-Rays, आणि स्ट्रीम्स मधून चित्रफीत छापून त्याचा उच्च दर्जाचा सुजाण वापर अव्यावसायिक चित्रफीत, जसे कि व्हिड्स आणि OVA, बनवायला देते. सुटीचे नूतनीकरण करण्याची प्रक्रिया दर तीन वर्षाला होते, त्यामुळे आता अजून तीन वर्ष आपल्याला खूप छान व्हिड्स आणि OVA बघायला मिळतील! तसेच, ऑक्टोबर मध्ये कायदेविषयक समितीने राहिलेल्या स्वामित्व धोरणांबद्दल सह्योगीनशी भेट घेतली.

V. सगळे स्वयंसेवक बद्दल!

२६ सप्टेंबर ते २२ ऑक्टोबर मध्ये, स्वयंसेवक पदभरती समिती ने १३३ नवीन विनंत्या प्राप्त केल्या आणि १६२ पूर्ण केल्या, ज्यामुळे ५४ खुल्या विनंत्या राहिल्या आहेत (प्रतिष्ठापना आणि काढण्याची कार्य धरून, जी खाली सूचित केली आहेत).

२२ ऑक्टोबर २०२३ पर्यंत, OTW मध्ये ९२२ स्वयंसेवक आहेत. अलीकडील कर्मचारी हालचाली खाली नमूद केल्या आहेत.

नवीन संचालक: जिझिन झान्ग, किआओ चू, कॅथरीन सोडरहोम, जेनिफर हेनस, आह फाम
नवीन फॅनलोर स्वयंसेवक: मेगस फ्रेट्टी आणि सिलॅरोना (ग्राफिक डिझायनर)
नवीन रसिकमुक्तद्वार प्रकल्प स्वयंसेवक:
आरकेडअनमॅग्गी, बेलेआ, हेसनदी, अरोराटी, आमंडा हार्टली, सोचील कू, केला जी, किरा क्यू, आणि आणखी ४ प्रशासकीय स्वयंसेवक
नवीन नियम आणि तक्रारनिवारण समिती स्वयंसेवक: क्रोम, पी एस, असटर, दे, जनबी, झीनोसिम्प, इंत्यालोटे, आणि आणखी २ स्वयंसेवक
नवीन धोरणात्मक आराखडा समिती स्वयंसेवक: अड्रिफ्टदेन, पॉवरकॉर्ड्स, आणि आणखी १ स्वयंसेवक
नवीन स्वयंसेवक पदभरती समिती स्वयंसेवक: पीअँडसी (वरिष्ठ स्वयंसेवक) आणि आणखी १ वरिष्ठ स्वयंसेवक
नवीन जालविषयक धोरण समिती स्वयंसेवक: २ स्वयंसेवक

निर्गमन करणारे समिती अध्यक्ष: केट सँडर्स (धोरणात्मक नियोजन)
निर्गमन करणारे फॅनलोर स्वयंसेवक: पेट्रिकोर (सोशीआल मीडिया आणि पोच)
निर्गमन करणारे अर्थसमिती स्वयंसेवक: निकी बर्ड (आर्थिक विश्लेषक)
निर्गमन करणारे रसिकमुक्तद्वार प्रकल्प स्वयंसेवक: १ इम्पोर्ट सहाय्यक
निर्गमन करणारे नियम आणि तक्रारनिवारण समिती स्वयंसेवक: आलअँडविथनोनेम, आणि आणखी २ स्वयंसेवक
निर्गमन करणारे समिती-संवाद समिती स्वयंसेवक: जेआर आणि मेन
निर्गमन करणारे टाचणखूण समिती स्वयंसेवक: एलोरा, आलअँडविथनोनेम, आणि आणखी २ टाचणखुण समिती स्वयंसेवक
निर्गमन करणारे भाषांतर समिती स्वयंसेवक: मेकपीसलव्हजॉय (स्वयंसेवक व्यवस्थापक) आणि ३ स्वयंसेवक
निर्गमन करणारे स्वयंसेवक पदभरती समिती स्वयंसेवक: १ स्वयंसेवक
निर्गमन करणारे जालविषयक धोरण समिती स्वयंसेवक: १ स्वयंसेवक

आमच्या समित्यांच्या कार्यक्षेत्रांबद्दल अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईट वरील समिती सूची पहा.


OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ पहा.

Newsletter

Comments are closed.