ऑक्टोबर २०२२ सदस्यत्व मोहीम: आमच्या यशाची शिखरे साजरी करताना

दरवर्षीची ती वेळ परत आली आहे: OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) आमची ऑक्टोबर सदस्यता मोहीम सुरु करत आहे, आणि आम्ही आपले समर्थन खूप आवडेल! आणि आमचे सर्व प्रकल्प १००% स्वयंसेवक आणि देणग्या चालवतात. उभारलेला प्रत्येक डॉलर सर्वर राखण्यात, आमच्या कामाला समर्थन देण्यात, आणि आमच्या रसिककृतींचे आणि रसिकसंस्कृतीनचे संरक्षण आणि वकिली करण्याच्या मिशन ला पुढे नेण्यात वापरला जातो. आमच्या निधी कश्या खर्च केल्या जातात ह्याबद्दल आणखी माहिती साठी आमचे सगळ्या अलीकडचे अर्थसंकल्प पोस्ट वाचा.

आमच्या कामाचे समर्थन करण्याबरोबर, एका विशिष्ठ रकमेच्या वरच्या देणग्या काही मस्त OTW धन्यवाद भेटवस्तूंची पात्र असतील! काय उपलब्ध आहे ह्याची पूर्ण यादी बघण्यासाठी आपण आमच्या देणगी पृष्ठाला भेट देऊ शकता, पण आम्ही इथे काही वैशिष्ट्ये सांगतो.

  • Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) आता १३ वर्षाचा आहे — म्हणजे AO3 वर स्वतःचे खाते उघडण्या इतका! हे साजरी करण्यासाठी, आमच्या कडे नवीन १३ व्या वर्धापनदिनाच्या पिन्स उपलब्ध आहेत.
  • आपण कदाचित आमचे मागच्या महिन्यातला उत्सव बघितला असेल जेव्हा पूर्ण OTW १५ वर्षांचे झाले. आमच्या हा उत्सव साजरी करण्यासाठी १५ व्य वर्धापनदिनाचे मॅग्नेट सुद्धा आहेत! हे दोन्ही वर्धापनदीनाना साजरी करणाऱ्या स्टिकर्स बरोबर एकत्र केले आहेत. सर्व वर्धापनदिनाच्या गोष्टी मर्यादित आवृत्या आहेत, त्यामुळे जर आपल्याला त्या आवडल्या असतील, तर त्या उपलब्ध असे पर्यंत नक्की घ्या!
  • आम्हाला रसिकगट ट्रॉप पत्ते ह्यांचा सुद्धा इथे उल्लेख करायचा आहे, ज्यांनी एप्रिल मध्ये पदार्पण केले आणि आमच्या देणगीदारांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. प्रत्येक पत्त्यावर एक विशिष्ठ शब्द कला आहे जी वेगवेगळ्या रसिक शब्दांचा आणि ट्रॉप्स चे चित्रण करते जे AO3 च्या टाचांखुनांमध्ये दिसून येतात. जे देणगीदार $१०० किंवा त्यावर देणगी देऊ शकतात त्यांच्यासाठी हि गोष्ट अजूनही उपलब्ध आहे.

जर आपल्याला धन्यवाद भेटवस्तूंमधे रस असेल पण इतकी मोठी देणगी एका वेळेला देता येत नसेल तरी काळजी करू नका! आम्ही तुमची काळजी घेऊ. आपण एका छोट्या रकमेसाठी वारंवार येणारी देणगी सुरु ठेऊ शकता, आणि आपल्या देणगी पावती मधील फॉर्म भरा ज्यातून आमच्या अर्थपुरवठा आणि सदस्यता समिती ला कळेल कि आपल्याला कोणत्या भेटवस्तू साठी वाचवून ठेवायचे आहे. ते ती वस्तू बाजूला ठेवतील आणि आपल्याला ते पाठवले जाईल जेव्हा आपली एकत्रित रक्कम त्या निवडलेल्या भेट्वस्तूच्या स्तरावर पोचेल.

OTW ला देणग्या देण्याचा आणखीन एक मोठा फायदा म्हणजे जर आपण $१० किंवा त्याहुन जास्त देणगी दिलीत तर आपल्याला OTW च्या पुढच्या वर्षीच्या संचालक मंडळाच्या, जे OTW च्या कामकाजाची देखरेख करतात, निवडणुकांमध्ये मत देता येईल. आमच्या निवडणुकीच्या प्रक्रियेबद्दल आपण OTW निवडणूक वेबसाई वर वाचू शकता. जर आपल्याला पुढच्या ऑगस्ट २०२३ च्या निवडणुकीत मत द्यायचे असेल, आपण आज $१० किंवा त्याहून जास्त ची देणगी देऊन सदस्य होऊ शकता आणि देणगी फॉर्म वर “become a member” (सदस्य व्हा) हे निवडून. आपली सदस्यता पात्रतेची देणगी दिल्या दिवसापासून एक वर्ष वैध राहील.

जर आपल्याला ला ह्या वेळेस देणगी देता येत नसेल, तर काहीच हरकत नाही! आणि जर आपल्याकडे थोडा वेळ असेल, तर आम्हाला आपली मदत खूप आवडेल ह्या सदस्यता मोहिमेबद्दल सर्वांना सांगण्यामध्ये. नेहमीप्रमाणे, आपण OTW आणि त्याच्या सर्व प्रकल्पांचे समर्थन करण्यासाठी जे सगळं करता त्याबद्दल आम्ही अत्यंत कृतज्ञ आहोत. आमच्या समाजाचा भाग झाल्याबद्दल धन्यवाद!


OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठपहा.

Event

Comments are closed.