
आमची ऑक्टोबर सदस्यत्व मोहीम संपली आहे, आणि आम्ही तुमच्या उदारतेबद्दल अधिक कृतज्ञ होऊ शकत नाही. आम्हाला जाहीर करण्यात आनंद होत आहे की ७८ देशांमधील ७,६८३ देणगीदारांचे धन्यवाद, आम्ही एकूण US$२,७६,४६७.६९ जमा केले आहेत! तुमच्यापैकी ६,१४७ लोकांनी तुमच्या देणगीसह तुमचे OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) सदस्यत्व सुरू करणे किंवा नूतनीकरण करणे निवडले याचा आम्हाला विशेष आनंद झाला.
सदस्यत्व मोहीम आत्तासाठी संपली असली तरी, आम्ही वर्षभर देणग्या स्वीकारतो. तुम्ही वर्षाच्या कोणत्याही वेळी मतदानाचे सदस्य बनू शकता—तुम्हाला ऑगस्टमध्ये आमच्या वार्षिक OTW संचालक मंडळाच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी पात्र होण्यासाठी फक्त ३० जून २३:५९ UTC पर्यंत सामील व्हावे लागेल.
आमची अर्थपुरवठा आणि सदस्यता समिती तुमच्या देणगी भेटी पाठवण्यासाठी कठोर परिश्रम करत असताना, आम्हाला आभार मानण्यासाठी थोडा वेळ घ्यायचा आहे. तुमच्या समर्थनाशिवाय आम्ही येथे असू शकत नाही: तुमचे आर्थिक योगदान, फॅनलोर लेख, Transformative Works and Cultures – TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) उद्धरणे, Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) वर टिप्पण्या आणि टाळ्या, आणि रसिककृत्या जुने आणि नवीन दोन्ही. हे आमच्यासाठी खूप मान्य ठेवतं आणि आम्ही खूप कृतज्ञ आहोत! या मोहिमेतील तुमच्या सहभागाबद्दल आणि आज जे आहे ते OTW बनवल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ पहा.