
OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) ची ऑक्टोबर सदस्यता मोहीम पूर्ण झाली आहे, आणि आम्हाला हे सांगायला खूप आनंद होत आहे की आम्ही तब्बल US$195,009.65 उभारले आहेत, आमच्या US$४०,००० च्या ध्येयायहून खूप जास्त. आम्ही आमची सदस्यता सुद्धा 4,786 पर्यंत वाढवली आहे. हे शक्य झाले आहे 6,700 दात्यांच्या उदारतेमुळे, जे जगभरातील 77 देशातून आहेत. नेहमीप्रमाणेच, आम्ही आमच्या जागतिक समुदायासाठी खूप कृतज्ञ आहोत. धन्यवाद! तुमचे समर्थन आम्हाला आमच्या मिशन च्या सेवेत काम चालू ठेवायला देते ज आहे: रसिककृतींना आणि रसिकसंस्कृतींच्या सर्व रूपांना शिरकाव देऊन आणि जोपासून आम्ही प्रतिनिधित्व करीत असलेल्या रसिकांचे हितसंबंध पुढे करणे.
आम्हाला धन्यवाद स्वयंसेवकांनाही धन्यवाद म्हणायचे आहे, ज्यांच्या सेवेमुळे ही मोहीम सुरळीत पार पडली, आणि अर्थातच सर्व वापरकर्त्यांना ज्यांनी ह्या मोहिमेबद्दल आपल्या मित्रांना आणि ओळखीच्यांना सांगितले, पोस्ट केले आणि ट्विट केले. आमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुमची मदत अमूल्य आहे. आम्हास तुम्हा सर्वांचे खूप कौतुक आहे!
अखेरीस, तुम्हाला जर अजूनपर्यंत देणगी देता आली नसेल तर काळजी करू नका! आम्ही वर्षभर देणग्या स्वीकारतो. OTW ची सदस्यता, जी अश्या सगळ्यांसाठी उपलब्ध असते जे US$१० किंवा जास्त ची देणगी देतात, सर्वात अलीकडच्या US$१० देणगीच्या तारखेपासून एक पूर्ण वर्ष लागू राहते; त्यामुळे जे आता देणगी देतील ते सुद्धा पुढच्या वर्षीच्या OTW संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी पात्र असतील. US$४० किंवा जास्त च्या देणग्यांसाठी आम्ही देत असलेल्या धन्यवाद भेटवस्तू सुद्धा चालू स्थितीत उपलब्ध आहेत. देणगी देण्यासाठी कुठलिही वेळ कायम चांगलीच असते!