ऑक्टोबर २०२१ बातमीपत्र, खंड १६२

I. LEGAL ADVOCACY (कायदेविषयक मदत)

कायदेविषयक समिती ला ऑक्टोबर मध्ये खूप चांगली बातमी मिळाली: यु.एस. सरकारी स्वामित्व संस्थेने रसिकचित्रफीतकारांना DMCA वरचढपणा-विरोधी तुरतुदीला असलेल्या सुटीचे नूतनीकरण केले आहे. म्हणजे, रसिकचित्रफीतकारांना डिव्हीडीज, ब्ल्यू-रेज, व ऑनलाईन स्त्रोतांची अव्यावसायिक रसिकचित्रफीत बनवण्यासाठी परवानगी देणाऱ्या अस्तित्वात असलेल्या सुटेची आणखी तीन वर्षांची मुदतवाढ आपण जिंकली आहे. ह्या वर्षीच्या सुरुवातीला कायदेविषयक समितीने सरकारी स्वामित्व संस्थेला रसिकचित्रफीतकारांना मिळणाऱ्या सूटीच्या नूतनीकरणाचा वादविवाद आणि स्पष्टीकरण करणाऱ्या टिप्पण्या पाठवल्या होत्या.

II. AT THE ARCHIVE OF OUR OWN – AO3 (आमचा स्वतःच्या संग्रहात)

Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्पाने) ॲाफ एल्वस् ॲंड मेन लवकरच बाहेरून उचलण्याचे आणि गिलमोर गर्लस् ॲडल्ट फिक बाहेरून उचलण्याचे काम पूर्ण झाल्याचे जाहीर केले.

नियम आणि तक्रारनिवारण समितीच्या मदतनोंदीत थोडी वाढ झाली, आणि त्यांच्याकडे ऑक्टोबर च्या शेवटी २४०० नवीन नोंदी आल्या होत्या. समिती-संवाद समिती ला ह्या महिन्यातसुद्धा प्रातिनिधिक मदतनोंदी मिळाल्या, भाषांतर समितीचा इथे खास उल्लेख केला पाहिजे कारण ते सात्यत्याने समिती-संवाद समितीच्या १०% नोंदींचे भाषांतर करतात.

सप्टेंबर मध्ये, टाचणखुण समिती ने ४६,००० रसिकगटांमधील ३४०,००० टाचणखुणा संभाळल्या.

III. ELSEWHERE AT THE OTW (OTW वर इतरत्र)

अर्थपुरवठा आणि सदस्यता समिती ची ऑक्टोबर सदस्यता मोहीम, बाय फॅन्स, फॉर फॅन्स, यशस्वी झाली, ज्यात जनसंपर्क समितीच्या समन्वयाने बातमी पोस्ट्स बनवले होते, जे भाषांतर समितीने ३७ भाषांमध्ये भाषांतरित केले. OTW ने एकूण US$१९५,००९.६५ उभे केले, जे आमच्या US$४०,००० च्या उद्देश्याच्या तुलनेत खूप जास्त आहेत. जगभरातील ७७ देशातील ६७०० रसिकांनी मोहिमेला देणग्या दिल्या, आणि ४७८६ देणगीदारांनी OTW ची सदस्यता घेण्याचा किंवा नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला. ज्यांनी देणग्या दिल्या आणि ह्याबद्दल इतरांना सांगितले त्या सर्वांना धन्यवाद!

Transformative Works and Cultures – TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) मार्च २०२२ च्या अंकासाठी तयारीत आहे. नवीन संपादक, पो जॉन्सन आणि मेल स्टॅफिल, अजून प्रशिक्षण घेत आहेत, तसेच व्यवस्थापनीय संपादक क्रिस्टीन मेन सुद्धा शिकत आहे. त्यांनी आत्ताच कॉपीएडिटर आणि प्रूफरिडर सुद्धा नेमले आहेत.

अर्थसमिती ने ऑक्टोबर १६ ला अद्ययावत अर्थसंकल्पप्रश्नांची उत्तरे द्यायला एक सार्वजनिक सभा घेतली.

IV. स्वयंसेवक आगमन आणि निर्गमन

२५ सप्टेंबर ते २४ ऑक्टोबर, स्वयंसेवक पदभरती समितीला १३३ नवीन विनंत्या मिळाल्या, आणि त्यांनी १२२ विनंत्या पूर्ण केल्या. यामुळे सद्यस्थितीत ४१ विनंत्या खुल्या आहेत (प्रतिष्ठापन आणि निवारण धरून, ज्याबद्दल खाली सांगितले आहे).

२४ ऑक्टोबर २०२१ या तारखेपर्यंत, OTW मध्ये १०४३ स्वयंसेवक आहेत. सद्ध्याच्या स्वयंसेवकांच्या हालचाली पुढील प्रमाणे आहेत.

नवीन टाचणखुण संपादक स्वयंसेवक: आलास्टेअर, आर्केडिया, एव्हरी रेने, कार्बन, क्लेमेंटाईनस्, ईजे बेल, फेटलग्रेस, फॉल्टी स्टार्ट, फिन, फ्रिकी, ग्रेटल, इबड्रिमस्, जुहोस, एल रेक्स, लेडीव्हीग्र्,लॅाली, लिव्ही, लिलियानामेलो१६, लिक्स सॅांग, मालिनी, मेरविट्रेअम, मिनी, मोशे, मोर्गन वाय, श्निकिज, सिन, स्काल्ड, स्टारड्रिमर, टाय, टोबियास, व्हायोलेटसी आणि ६ स्वयंसेवक.

प्रस्थान होणारे संचालक: लेक्स डे लेओन & नटालिया ग्रुबर
प्रस्थान करणारे समिती कर्मचारी: लिरिआना (भाषांतर समिती), सिजिंग झी आणि आणखी एक AO3 डॉक्स कर्मचारी, आणि २ समिती-संवाद समिती कर्मचारी.
प्रस्थान करणारे रसिकमुक्तद्वार प्रकल्प स्वयंसेवक: २ स्वयंसेवक
प्रस्थान करणारे टाचणखुण संपादक स्वयंसेवक: फ्लेमथ्रोवर, रिबेका स्नायडर आणि आणखी तीन स्वयंसेवक
प्रस्थान करणारे अनुवाद स्वयंसेवक: आत्रेयी, अकुस्टीकअल्कोनोस्ट, आधारा, एंबरकॅटफिश, बीबीआना, ब्लांका रोड्रिगेज, इस्रेरेक्वेईम, कॉझकोडेर, नॉवेया, सोफी के, स्टेलाहायबरनिस, वीसवोल्ड आणि ६ स्वयंसेवक.

आमच्या समित्यांच्या कार्यक्षेत्रांबद्दल अधिक माहिती साठी, कृपया आमच्या वेबसाईट वरील समिती यादीबघा .


OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ पहा.

Newsletter

Comments are closed.