ऑक्टोबर २०२१ ड्राइव्ह: चाहत्यांद्वारे , चाहत्यांसाठी

OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) हे प्रेमाचे श्रम आहे. हे चाहत्यांद्वारे, चाहत्यांसाठी बनवलं गेलं आहे. आम्ही एक ना-नफा-ना-तोटा तत्त्वाधारित संस्था आहोत, आणि आम्ही १००% देणग्यान वर अवलंबून आहोत: आमच्या स्वयंसेवकांन कडून वेळेची देणगी आणि आम्ही सेवा देत असलेल्या समुदायाकडून निधीचे दान. आज आमच्या द्विवार्षिक सदस्यता मोहिमेची सुरवात आहे, जेव्हा आम्ही विचारतो की तुमच्यापैकी जे हे करण्यास सक्षम आहेत त्यांनी आमच्या कार्याला समर्थन देण्यासाठी आर्थिक योगदान देण्याचा विचार करावा. आम्ही तुमचे पैसे आमच्या बजेटमध्येकसे खर्च करतो याबद्दल वाचू शकता.

OTW ला तुमची देणगी आमच्या सर्व प्रकल्पांमध्ये आमच्या कार्याला समर्थन देते: Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) पासून फॅनलोरपर्यन्त; आमच्या शैक्षणिक पत्रिका Transformative Works and Cultures – TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) पासून, ते आमच्या रसिककृती बचाव प्रकल्प Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प) आणि आमच्या कायदेविषयक समिती ची जगभरात परिवर्तनकारी कामांसाठी वकिलीपर्यन्त. देणगीदारांनाही अधिक थेट फायदा होतो. US$10 किंवा त्याहून अधिक कोणत्याही एकवेळच्या देणगीसह, आपण OTW चे वार्षिक सदस्यत्व घेणे निवडू शकता ज्याच्याने तुम्हाला संचालक मंडळाच्या निवडणुक मध्ये मत देण्याचा अधिकार तुम्हाला मिळेल, जी दरवर्षी ऑगस्टमध्ये होते.

सदस्यांना एक डिजिटल चिन्ह देखील प्राप्त होते जे ते आपल्या AO3 वर किंवा सोशल मीडिया प्रोफाइलवर वापरू शकतात; आणि ज्यांनी आपली OTW सदस्यता तीन, पांच, किंवा दहा वर्षांसाठी चालू ठेवली आहे ते काही विशेष स्मारक भेटवस्तू.साठी अनुरूप होतात. सदस्यत्व आणि मतदानबद्दल आणखीन जाणून घ्या.

जे US$40 किंवा जास्त देणगी देतील ते अनेक धन्यवाद भेटवस्तूंमधून पसंत करू शकतात. या वर्षी नवीन मर्यादित-आवृत्ती पांढरा मध्ये एक OTW टम्बलर आणि एक नवीन स्टिकर संच आहे. जर तुम्हाला या आकाराची देणगी करणे परवडत नसेल तर काळजी करू नका: आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुम्ही एक आवर्ती देणगी चालू करू शकता aएका अश्या पातळी वर जे तुम्हाला अनुरूप वाटेल आणि आमच्या अर्थपुरवठा आणि सदस्यता समिती ला हे कळवा wकी तुम्हाला कोणच्या भेटी साठी तुम्हाला पैशे वाचवायचे आहेत. एकदा तुमच्या देणग्या अनुरूप पातळी वर पोचल्या की ते तुमची भेट तुम्हाला पाठवतील.

OTW अमेरिकेत नोंदणीकृत ना-नफा-ना-तोटा संस्था आहे आणि या देशातील देणगीदार त्यांच्या नियोक्त्याकडून जुळलेल्या देण्याच्या योजनांचा लाभ घेऊ शकतात. तुमच्यासाठी ही शक्यता आहे का हे शोधण्यासाठी कृपया तुमच्या कामाच्या ठिकाणी बोलण्याचा विचार करा!

जर तुम्ही या वेळेस देणगी करू शकत नाही तर, कृपया ही पोस्ट इतरांसह सामायिक करण्याचा विचार करा आणि हे जाणून घ्या की आम्ही तुमच्या समर्थनाचे कौतुक करतो तुम्ही ते कसही दिलं तरी. तुमचे पैसे, तुमचा वेळ आणि तुमच्या प्रेमाबद्दल धन्यवाद. आम्ही त्याशिवाय इथे नसतो!

Event

Comments are closed.