ऑक्टोबर २०२० ड्राइव्ह: आपल्या समर्थनाबद्दल धन्यवाद

OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) ची द्वि-वार्षिक सदस्यता ड्राइव्ह संपली आहे आणि, आम्ही आनंदी आहोत की जरी आम्ही ५००० नवीन सदस्यांचे लक्ष्य गाठू शकलो नसू तरी आम्ही ६९ देशांमध्ये एकूण २५०० सदस्यता नोंदणीकृत केल्या आहेत, ज्या मुळे या कालावधीत एकूण US$८९,६८८.५१ निधी उभारली गेली आहे. आपल्या सर्वांचे शतश: धन्यवाद!

आपल्यापैकी बर्‍याचजणांनी OTWसाठी आपल्या औपचारिक समर्थनाची संधी साधली आहे, आम्हाला याबद्दल खूप आनंद झाला आहे. ओटीडब्ल्यू ही एक न-नफा-न-तोटा संस्था आहे आणि आम्ही जगभरातील चाहत्यांच्या सर्जनशील, आर्थिक आणि लॉजिस्टिकल योगदानावर अवलंबून आहोत. आमच्या अलीकडील बजेट पोस्ट मध्ये तपशीलवार माहिती दिल्याप्रमाणे, आमच्या सदस्यांचे औदार्य आमच्या संग्रह, कायदेशीर, शैक्षणिक आणि तांत्रिक कार्यास समर्थन देते आणि रसिककृती आणि रसिकसंस्कृती जतन करण्याचे आमचे ध्येय पुढे चालू ठेवण्यास आम्हाला मदत करते. धन्यवाद!

आणि जर आपण अद्याप आपली सदस्यता नोंदविली नसेल तर काळजी करू नका! ओटीडब्ल्यू संपूर्ण वर्षभर, सदस्य आणि देणगी, दोन्ही स्वीकारतो.


OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ पहा.

Announcement

Comments are closed.