एप्रिल २०२४ सदस्यत्व मोहीम: रसिककृत्या सुरक्षित ठेवणे

OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) ने अलीकडेच आमच्या प्रकल्प वापरकर्त्यांना आमच्या कामाबद्दल काय माहिती आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांच्यासोबत दोन सर्वेक्षणे पूर्ण केली आहेत. आमच्या १६व्या वर्धापन दिन सर्वेक्षण मध्ये, प्रतिसाद देणाऱ्या ६७,४७४ रसिकांपैकी ८७% रसिकांनी सांगितले की त्यांनी कधीही OTW च्या Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प) बद्दल ऐकले नाहीये. तथापि, आमच्या आंतरराष्ट्रीय रसिककृती दिवस (IFD) १०व्या वर्धापन दिन सर्वेक्षण मध्ये, ६०% पेक्षा जास्त सर्वेक्षणकर्त्यांनी सांगितले की त्यांना हे माहित आहे की OTW रसिकगट संग्रहण संरक्षित करते, जरी फक्त २८% लोकांना माहित होते की आम्ही भौतिक रसिककृत्या देखील जतन करण्यास मदत करतो.

म्हणून आम्ही हा OTW प्रकल्प करत असलेल्या महत्त्वाच्या कामावर प्रकाश टाकू इच्छितो. रसिकमुक्तद्वार प्रकल्पाची सुरुवात २००९ मध्ये रसिककृत्या, जसे की झाइन, ऑडिओ आणि व्हिडीओ टेप्स आणि क्षणभंगुर, शैक्षणिक लायब्ररींना देणगी देऊन सुरू झाली जे त्यांना ठेवतात आणि त्यांचे संरक्षण करतात. २०१२ मध्ये, त्यांनी आत्तापर्यंत केलेले १०० डिजिटल संग्रहित आयात Archive of Our Own – AO3 वर (आमचा स्वतःचा संग्रह) करण्याची सुरुवात केली. हा प्रकल्प सर्व भाषा आणि स्वरूपांमध्ये संग्रहण कृत्या आयात करतो.

२०२२ मध्ये, त्यांनी एक पाऊल पुढे टाकला आणि AO3 Fanzine Scan Hosting Project (AO3 रसिक-मासिक स्कॅन होस्टिंग प्रकल्प) बनवले, ज्याद्वारे रसिककृत्या आणि रसिककला जे मूळतः छापल्या गेलेल्या रसिक-मासिक मध्ये प्रकाशित केले गेले होते ते AO3 मध्ये आयात केले जातात.

जेव्हा तुम्ही OTW ला समर्थन देता, तेव्हा तुम्ही रसिकमुक्तद्वार प्रकल्पाच्या कामाला आणि आमच्या सर्व प्रकल्पांना इतिहास जतन करण्यासाठी आणि रसिकांनी दशकांपासून तयार केलेल्या कृत्यांना समर्थन देता. आणि जे देणगी देण्यास सक्षम आहेत त्यांच्यासाठी आमच्याकडे काही वस्तू आहेत ज्या तुम्हालाही ठेवण्यास योग्य वाटतील असे आम्हाला वाटते!

पोएट्री चुंबक एका फ्रीज वर ज्याच्यावर इंग्रजीमध्ये दोन वाक्ये लिहिली आहेत. प्रत्येक शब्द एक वेगळे चुंबक.

आमच्या IFD सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की सर्वेक्षण करणाऱ्यांपैकी ११% पेक्षा जास्त लोकांनी रसिक कविता तयार केल्या आहेत. परंतु जर तुम्ही अद्याप केले नसेल तर, US$७५च्या देणगीनी तुम्ही आमच्या नवीन कविता चुंबकांसह मजेदार रसिक शब्दांसह प्रयत्न करू शकता!

मांजर, ससा, राक्षस आणि कुत्रा या प्राण्यांच्या आकृत्यांसह AO3 लोगोच्या ५ प्रतिमा जे त्यांच्या आत आणि आजूबाजूला काढलेले आहेत.

US$४० देणगीसाठी, आमच्याकडे आता प्राणी धीम असलेल्या OTW + प्रकल्प लोगोचा एक नवीन स्टिकर संच आहे.

तुम्ही आवर्ती देणगी सेट करू शकता आणि तुमच्या आवडीच्या भेटवस्तूसाठी बचत करू शकता. फक्त तुम्हाला हवी असलेली भेट निवडा आणि जर त्तुम्ही निवडलेल्या भेटवस्तूसाठी तुमची देणगी आवश्यक असलेल्या रकमेपर्यंत पोहोचत नाही तर भविष्यातील देणग्या लागू केल्या जातील. तुमच्यापैकी जे यूएस मध्ये आहेत ते नियोक्ता जुळणीद्वारे तुमचे योगदान दुप्पट करू शकतात: हा पर्याय आहे का हे शोधण्यासाठी तुमच्या एचआर विभागाशी संपर्क साधा.

US$१० किंवा त्याहून अधिक देणगी देखील तुम्हाला OTW चे सदस्य बनण्याची अनुमती देईल. OTW सदस्यांना संचालक मंडळाला – OTW चे प्रशासकीय मंडळाला मत देण्याचा अधिकार आहे. ऑगस्टमध्ये होणाऱ्या या वर्षीच्या निवडणुकीत तुम्हाला मतदान करायचे असल्यास सदस्य होण्यासाठी तुमच्याकडे ३० जून २०२४ पर्यंत वेळ आहे.

आम्हाला आशा आहे की तुमच्यापैकी अनेकजण रसिकमुक्तद्वार प्रकल्प, तसेच AO3, फॅनलोर, Transformative Works and Cultures – TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती), and OTW Legal Advocacy (कायदेविषयक मदत) यांच्या कामासाठी दान करतील. आणि त्या सर्व OTW सदस्यांसाठी जे त्यांच्या सदस्यत्वाचे नूतनीकरण करत आहेत, तुमच्या सतत समर्थनासाठी धन्यवाद!


OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ पहा.

Event

Comments are closed.