एप्रिल २०२४ वृत्तपत्र, खंड १८८

I. आपल्या बातम्या इथे वाचा!

जनसंपर्क समिती ने दीर्घ प्रतिक्षीत OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) ई-मेल द्वारे बातमी पत्र भाषांतर समितीच्या मदतीने आता सुरु केले आहे. आपली बातमी पत्रे सदस्यांच्या ई-मेल मध्ये थेट पोचवण्याची सेवा फुकट आहे. मराठी धरून, आटा १६ भाषा उपलब्ध आहेत. भविष्यात आणखीन भाषा उपलब्ध होण्याची शक्यता आहे, आणि जर असे झाले तर ते भविष्यातील OTW वृत्तपत्रात घोषित केले जाईल.

II. ARCHIVE OF OUR OWN – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) मध्ये

उपलब्धता, आखणी आणि तंत्रज्ञान समिती एप्रिल मध्ये वेगवेगळ्या गोष्टींचे निराकरण करत होती, ज्यात उपलब्ध आहे भेटींना लागू असलेले संबंध बंदी वैशिष्ट्य अपडेट करणे. त्यांना तात्पुरत्या पाहुण्यांच्या टिप्पण्या हि बंद कराव्या लागल्या कारण काही दिवस अनपेक्षितपणे अपमानास्पद स्पॅम चा ओघ अचानक आला. नियम आणि तक्रारनिवारण समिती, समिती-संवाद समिती, आणि तांत्रिक व्यवस्था समिती च्या साहाय्याने हा हल्ला त्यांनी सांभाळला आणि भविष्यातील तिपंन्यांमधील गैरवर्तन आणि स्पॅम विरुद्ध कसे लढायचे ह्या बद्दल चर्चा केली. भाषांतर समिती ने सुद्धा हि स्पॅम ची परिस्थिती बातमी पत्राद्वारे AO3 च्या वापरकर्त्यांना समजावण्यासाठी पटकन काम केले.

रसिकमुक्तद्वार प्रकल्पाने एका लायब्ररी ऑफ काँग्रेस च्या बैठकीत डिजिटल संरक्षण पायाभूत सुविधेवर सादरीकरण केले! त्यांनी फिनिक्स: मायकल बेइहँन संग्रह, एक विवीधरासिकगटाच्या रसिककृती संग्रह जो मायकल बेइहँन ने खेळलेल्या पात्रांवर जोर देतो, बाहेरून आल्याचीही घोषणा केली.

मार्च मध्ये समिती-संवाद समिती ला २००३ तिकिटे मिळाली. नियम आणि तक्रारनिवारण समिती ला मार्च मध्ये २०५७ तिकिटे मिळाली, आणि हि समिती हळूहळू नवीन भरती ची तयारी करत आहे. ह्या तयारी अंतर्गत, त्यांनी आपले नियम आणि तक्रारनिवारण समिती माहिती पृष्ठ (इंग्रजी मध्ये) अपडेट केले आहे, आणि आपल्या गोपनीयता धोरणाचे (इंग्रजी मध्ये) पुनरावलोकन केले आहे. ज्यांनी ह्या समिती मध्ये सामील व्ह्याचे असेल त्यांनी अधिक माहिती साठी लवकरच लक्ष ठेवा!

टाचणखूण समितीने विशिष्ठ रसिकगटांशी संबंधित नसलेल्या टाचणखुणा संपादित करण्यासाठीच्या नवीन प्रक्रियांची चाचणी करण्याचे काम चालू ठेवले. सध्या ते दुसरी राऊंड (इंग्रजीची तम्बलर पोस्ट) अपडेट करण्याच्या प्रक्रियेत आहेत, ज्यात There Was Only One Bed (एकच पलंग होता), Mommy Kink (मोमी किंक), Isekai and Transmigration (इसेकाय आणि ट्रान्समायग्रेशन) आणि कोविद-१९ शी संबंधित अजून बऱ्याच टाचांखुणांचे मूळ-कथानकं समाविष्ट आहे. त्यांनी लिंग संबंधित टाचनखुणेअंतर्गत असलेल्या काही उप टाचांखुणांचे पुनर्रचन केले, काही टाचांखुनाना ज्यांचे नाव बदलायची गरज होती त्यांची नावे बदलली, आणि ब्राऊस आणि गाळणी करणे सोप्पे व्हावे म्हणून काही टाचणखुणा एकत्र केल्या.

टाचणखुणा पर्यवेक्षकांनी आधी फक्त त्यांच्या किंवा जास्तीतजास्त त्यांच्या खाली असलेल्या कामच भार प्रसारित करण्यासाठी नवीन प्रक्रियांच्या चाचणी ची अंमलबजावणी करणे सुरु केले आहे. शेवटी, त्यांनी रशियन भाषेतील टाचांखुनांच्या कार्यप्रवाहात बदल केले ज्यांनी रशियन मधील वाढलेल्या टाचणखुणा सांभाळण्याची कार्यक्षमता वाढेल. मार्च मध्ये, टाचणखुणा संपादकांनी ६४,००० रसिकगटांमधून ३७०,००० हुन अधिक टाचणखुणा सांभाळल्या – प्रत्येक संपादकाची ९३० हुन अधिक टाचणखुणा!

III. आपल्या क्रिया हव्या आहेत

अर्थपुरवठा आणि सदस्यता समितीच्या अधिवेशन आणि सजीव कार्येक्रमांची टीम मेलबॉऊर्न, ऑस्ट्रेलिया मधील सुपरनोवा मध्ये होती. ते चिकागो, यु एस मधील C2E2 आणि बुडापेस्ट, हंगेरी मधील कॉमिक कॉन ला सुद्धा जाणार आहेत. जर आपण आमच्या एखाद्या अधिवेशनाच्या टेबलावर रसिककार्याची शिफारस केली असेल, आपण आमच्या AO3 वरील लाईव्ह इव्हेंट रेक्स ह्या संकलनात ती शिफारस बघू शकता. आम्हाला आपण आपली स्टिकर्स कुठे लावली आहेत ह्याची छायाचित्रे आणि आपल्या #OTWThreeTropeDraw ची रसिककार्ये सुद्धा बघायला खूप आवडतील! OTW ला आपल्या आवडत्या सोसिअल मीडिया वर टॅग करा, आमच्या अधिवेशन टेबल ला भेट द्या, किंवा आपल्या शिफारसी AO3 वर ऍड करा.

फॅनलोरने आपल्या वैशिष्ट्यपूर्ण लेखाच्या प्रक्रियेबद्दलचे दस्तऐवजीकरण अपडेट केले आहे आणि आता त्यांच्या मे मधील थिमेड महिन्याची तयारी करत आहेत जो आशियाई रसिकगटांवर भार देईल. वैशिष्ट्यपूर्ण लेखांसाठी फॅनलोरच्या टंब्लर वर आणि ट्विटर/एक्स वर लक्ष ठेवा आणि त्यांच्या डिस्कॉर्ड सर्वर वर त्यांच्या थिमेड संपादित चॅट्स साठी मे मध्ये या!

कायदेविषयक समितीने रसिककृती आणि स्वामित्वा कायद्याबद्दल बऱ्याच वापरकर्त्यांच्या आणि प्रेस च्या प्रश्नांची उत्तरे दिली, ज्यात सामील होते रसिकबांधण्याचे आणि प्रस्तावित यु एस राज्यचे वय सत्यापित करणाऱ्या कायद्यांबद्दल प्रश्न होते. ते हे कायदेशीर प्रस्ताव जसे विकसित होतील तसे त्यावर लक्ष ठेवत आहेत. सद्यस्थितीत, हे कायदे OTW किंवा AO3 वर प्रभाव करणारे नसले तरी कायदेविषयक समिती संबंधित लोकांना आपल्या राज्य प्रतिनिधींशी संपर्क साधायला प्रोत्साहित करत आहे कारण इंटरनेट वरील वय सत्यापित करणारे कायदे आणखी रसिक जागांसाठी वाईट असू शकतात.

IV. शासन

ह्या महिन्यात संचालक मंडळ फार व्यस्त होते! त्यांनी एका कॉर्पोरेट सल्लागार फर्म बरोबर असलेला OTW चा करार पूर्ण केला आणि संस्थेच्या पुढील काही वर्षातील प्राधान्यक्रम आणि धोरणांची लागणाऱ्या नकाश्यावर काम करणे सुरु केले आहे. कारण आता नवीन तिमाहीत सुरु झाले आहे, संचालक मंडळाने काही समित्यांची भेट घेतली आणि काही धोरणांवर काम संपवले. हि धोरणे संबंधित समित्यांना त्यांच्या पुनरावलोकनासाठी आणि सहमतीची पाठवली गेली आहेत. एप्रिल मध्ये संचालक समितीने ह्या वर्षातील आपली दुसरी सार्वजनिक बैठक आयोजित केली. ह्या बैठकीत ८८ सदस्य होते आणि संचालक मंडळाने एकूण १२ प्रश्नांची बैठकीदरम्यान उत्तरे दिली आणि आणखीन १० प्रश्नांची उत्तरे २ आठवड्याने दिली. ह्या बैठकीचे मिनिट्स (इंग्रजी मध्ये) लवकरच उपलब्ध होतील.

धोरणात्मक आराखडा समिती सुद्धा संघनात्मक संस्कृती नकाश्यासाठी मदत करण्याचे काम करत आहे, वैविध्यपूर्ण जागा ह्याच्या ध्येयासाठी आणि नकाशाच्या अंमलबजावणीसाठी सुद्धा.

मंडळी सहायक समिती चा महिना सुद्धा व्यस्त होता. त्यांनी पूर्ण OTW भर CSAM च्या प्रक्रिया आणि OTW प्राप्त धोरण वर काम सुरु ठेवले. त्यांनी सार्वजनिक संचालक समिती बैठकींदरम्यान संचालक समितीच्या सदस्यांना समकालिक प्रश्न विचारण्याच्या प्रक्रिया तयार करण्याचे सुद्धा काम चालू केले, आणि ते ना-नफा स्वयंसेवनसाठी फुकट प्रशिक्षण संसाधने शोधण्याचे काम करत आहेत. त्यांनी संचालक मंडळाबरोबर बऱ्याच प्रकल्पांवर एकत्र काम केले आहे, ज्यात समाविष्ट आहे संस्कृती ऑडिट आणि नकाशासाठीचे काम.

OTW चे सायबर संरक्षण प्रतिनिधी हे समजण्याचा प्रयत्न करत आहेत कि माहिती OTW आणि AO3 मधून कशी जाते आणि त्यांनी समितीच्या अध्यक्षांबरोबर भेट सुद्धा घेतली आहे. ते लोक काय काम करतात, कसले संरक्षण करण्याबद्दल त्यांना काळजी वाटते आणि कुठे बंद कराव्या लागतील अश्या गॅप्स आहेत ह्यांच्याबद्दल माहिती गोळा करत आहेत.

निवडणूक समिती २०२४ च्या निवडणुकांसाठी तयारी करत आहेत. ह्या वर्षीची निवडणूक ऑगस्ट १६-१९ ला धरली जाईल. जुने ३० हा शेवटचा दिवस आहे ज्यादिवशी आपण देणगी देऊ शकता आणि सदस्य होऊ शकता ज्यामुळे आपल्याला मत देता येईल.

अर्थपुरवठा आणि सदस्यता समितीने एप्रिल ची सदस्यता मोहीम चालवली ज्यात ६०७३ देणगीदारांकडून यु एस $२०७,०८८.९१ उभारले गेले. ह्यातून ५२०० हुन अधिक देणगीदारांनी त्यांची सदस्यता घेतली किंवा वाढवली! ह्याच बरोबर, अर्थपुरवठा आणि सदस्यता समितीने ऑक्टोबर २०२३ मोहिमेशी संबंधित बहुतेक सर्व भेटी पाठवल्या आहेत. भाषांतर समितीने मोहिमेसंदर्भीत पोस्ट्स २७ भाषांमध्ये भाषांतरित केली आणि आता निवडणूक समिती चे पोस्ट्स भाषांतरित करण्याची तयारी करत आहे.

V. सगळ स्वयंसेवांबद्दल!

स्वयंसेवक पदभरती समिती ने समिती-संवाद अमितीमधील २ जागांसाठी बाहेरून भरती वर काम केले. इतर आतील प्रकल्पांवर काम करणे सुद्धार त्यांनी चालू ठेवले आहे, ज्यात समाविष्ट आहे नवीन आतील तक्रार आणि संघर्ष निराकरण उपसमिती.

एप्रिल २३, २०२४ पर्यंत, OTW मध्ये ८६६ स्वयंसेवक आहेत. अलीकडील कर्मचारी हालचाली खाली नमूद केल्या आहेत.

नवीन जनसंपर्क समिती स्वयंसेवक: फ्रोझनस्पेलमस्टर, जॅकलीन ब्रुक्स, लॉरी पी, आणि आणखी ३ ग्राफिक्स स्वयंसेवक
नवीन फॅनलोर स्वयंसेवक: जस्मिन टी (डिस्कॉर्ड नियंत्रक स्वयंसेवक), इंडस (सोशियल मीडिया आणि पोहोच स्वयंसेवक), आझीन (पोहोच विश्लेषक स्वयंसेवक) आणि अंकी २ सोशिअल मीडिया आणि पोहिच स्वयंसेवक
नवीन भाषांतर समिती स्वयंसेवक: पोरो (स्वयंसेवक व्यवस्थापक), चरिस्टिन दिनू, ईलइटेरेशन्स, सिल्विया एल, अँड आणखी ३ स्वयंसेवक

निर्गमन करणारे जनसंपर्क समिती स्वयंसेवक: २ मीडिया पोहोच स्वयंसेवक, १ इव्हेंट समन्वयक, १ भरती प्रशिक्षण आणि दस्तऐवजीकरण सहाय्यक, आणि एक रिपोर्ट लेखक
निर्गमन करणारे अर्थपुरवठा आणि सदस्यता समिती स्वयंसेवक: सी रायन स्मिथ (स्वयंसेवक)
निर्गमन करणारे फॅनलोर स्वयंसेवक: जस्मिन टी (फॅनलोर डिस्कॉर्ड नियंत्रक)
निर्गमन करणारे टाचणखूण समिती स्वयंसेवक: नरँडम (चेअर सहाय्यक, पर्यवेक्षक, आणि टाचणखुण संपादक), बिट्टरकॅप, गुलिया एफ, साराकायमरा, स्टुर्मलाईट, आणि आणखी ३ टाचणखुण संपादक
निर्गमन करणारे भाषांतर समिती स्वयंसेवक: आलीस एम (भाषांतर समिती स्वयंसेवक, व्यवस्थापक), आदी एम, सिनासा, एलेनसॅक्स, लाईस अँड आणखी ७ स्वयंसेवक

आमच्या समित्यांच्या विस्ताराबद्दल अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईट वर समिती सूची पहा.


OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ पहा.

Newsletter

Comments are closed.