
पुन्हा वर्षाची ती वेळ आली आहे – द्विवार्षिक OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) सदस्यता मोहीमची वेळ! २००७ मध्ये स्थापन झाल्यापासून, OTW तुमच्यासारख्या रसिकांच्या समर्थनावर अवलंबून आहे. हे समर्थन स्वयंसेवक तास तसेच आमच्या देणगीदारांच्या आणि आमच्या सदस्यांच्या अविश्वसनीय उदारतेच्या रूपात येते. तुमच्या देणग्यांनी आमच्या कामात या वर्षी कसे योगदान दिले आहे याबद्दल अधिक जाणण्या साठीआमचे अर्थसंकल्प नोंद बघा आणि, आपण सक्षम असल्यास,आज देणगी करण्यासाठी क्लिक करा.
या वर्षी देणगीदारांचे आभार मानणाऱ्या भेटवस्तूंचा एक चांगला नवीन स्लेट मिळाल्याने आम्ही उत्साहित आहोत ज्याच्यात OTW प्रकल्प लोगो दाखवणारे ट्रॅव्हल टम्बलर आणि Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) कार्य चिन्हे असलेले स्टिकर संच जेणेकरून तुम्ही तुमचे मित्र, पाळीव प्राणी आणि घरगुती वस्तू ह्यांना योग्यरित्या लेबल करू शकता. अर्थातच, इतर अनेक आकर्षक भेटवस्तूं सोबत आमची अत्यंत लोकप्रिय ट्रोप कार्डे अजूनही उपलब्ध आहेत.
या धन्यवाद भेटवस्तू US$४० पासून सुरू होतात; तुम्ही एक आवर्ती देणगी स्थापन देखील करू शकता आणि तुमच्या आवडीच्या भेटवस्तूसाठी बचत करू शकता. हे कसे स्थापन करायचे यावरील सूचना तुमच्या देणगी पावतीमध्ये समाविष्ट केल्या जातील. तुमच्यापैकी U.S. मधील लोक नियोक्ता जुळणीद्वारे तुमचे योगदान दुप्पट करू शकतात: हा तुमच्यासाठी पर्याय आहे का हे शोधण्यासाठी तुमच्या एचआर विभागाशी संपर्क साधा.
हे देखील लक्षात ठेवण्यासारखे आहे की US$१० किंवा अधिक देणगी तुम्हाला OTW चे सदस्य बनण्याची परवानगी देईल. OTW सदस्यांना एक विशेष सोशल मीडिया आयकॉन प्राप्त होतो आणि, महत्त्वाचे म्हणजे, संचालक मंडळाला मत देण्याचा अधिकार – OTW च्या प्रशासकीय मंडळाला. ऑगस्टमध्ये होणाऱ्या या वर्षीच्या निवडणुकीत तुम्हाला मतदान करायचे असल्यास सदस्य होण्यासाठी तुमच्याकडे ३० जून २०२३ पर्यंत आहे.
आम्हाला आशा आहे की तुमच्यापैकी बरेचजण देणगी देऊन ही OTW मध्ये सामील होण्याची संधी घ्याल,आम्ही या समुदायाच्या सर्व सदस्यांच्या पाठिंब्याबद्दल आभारी आहोत! तुम्ही AO3 वर रसिककृत्या घडवता, शेअर करता, त्यावर टिप्पणी करता किंवा टाळ्या पाठवता; फॅनलोर संपादित करता; Transformative Works and Cultures – TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) वाचता; किंवा OTW कायदेविषयक समिती कडून आलेली माहिती पसरवता, तुम्ही सर्व दररोज OTW आणि त्याच्या प्रकल्पांना आकार देण्यासाठी मदत करता. तुमचा वेळ, ऊर्जा आणि प्रतिबद्धता यासाठी आम्ही कृतज्ञ आहोत!
OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक रसिक-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दात्यांनी-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईट. आमच्या स्वयंसेवक अनुवादकांच्या टीमबद्दल व ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, हे पहा भाषांतर पृष्ठ.