
OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) ची एप्रिल मधील सदस्यता मोहीम आता संपली आहे, आणि आम्हाला हे सांगायला खूप आनंद होत आहे कि हि मोहीम US$२५२,३४३.९८ उभारून संपत आहे, आमच्या US$५०,०००.०० ह्या ध्येयापेक्षा खूप जास्त. ह्या देणग्या ७,८५२ लोकांकडून आल्या आहेत जे ७१ देशात राहतात: ह्या प्रत्येकाला धन्यवाद, आणि त्यांना सुद्धा ज्यांनी ह्या मोहिमेबद्दल पोस्ट आणि शेयर केले!
आम्हाला खास करून ह्याचा आनंद आहि कि ६,४५० इतक्या देणगीदारांनी OTW ची सदस्यता घेण्याचा किंवा नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला. OTW च्या वापरकर्त्यांशिवाय आणि सदस्यांशिवाय हि संस्था अस्तित्वातच नसती, आणि आमच्यासाठी आपला चालू आधार हा आमचा अभिमान आणि आनंद आहे! आम्हाला ह्याचा खूप आनंद आहे कि रसिककृतींच्या आणि रसिक संस्कृतींच्या इतिहासाला आधार देण्याचे, सावरण्याचे आणि उपलब्ध करून देण्याचे आमचे मिशन पटण्यासारखे वाटतं त्या लोकांना जे सगळ्यात महत्वाचे आहेत: स्वतः रसिक.
जर आपला उद्देश असेल देणगी देणे किंवा सदस्य बनणे पण आपण अजून हे केले नसेल, तर काळजी करू नका! OTW पूर्ण वर्ष देणग्या स्वीकारते आणि आपण कधीही US$१० किंवा जास्त ची देणगी देऊन सदस्य बनू शकता. सदस्यता देणगी दिलेल्या दिवसापासून एक वर्ष वैध राहते, त्यामुळे जर आपण आत्ता देणगी दिलीत तर आपण २०२३ संचालक मंडळाच्या निवडणुकांमध्ये आपले मत देऊ शकता, ज्या ऑगस्ट मध्ये होणार आहेत. आणि जेव्हा पण आपण देणगी देता तेव्हा आमच्या अनन्य भेटवस्तू उपलब्ध आहेत!
OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक रसिक-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दात्यांनी-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईट. आमच्या स्वयंसेवक अनुवादकांच्या टीमबद्दल व ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, हे पहा भाषांतर पृष्ठ.