एप्रिल २०२२ सदस्यता मोहीमः आता पत्ते आपल्या हातात आहेत.

OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) हे रसिकांनी, आकारले, घडविले आणि रचले. आम्हाला स्वयंसेवक श्रमिकांचा पाठिंबा आहे जे आमचे कर्मचारी आहेत आणि त्याचबरोबर आमच्या सदस्यांच्या उदारपणाचे पाठबळ सुद्धा आमच्या जवळ आहे. येत्या एप्रिल मध्ये, जेव्हा आम्ही आमची द्वैवार्षिक सदस्यता मोहीम प्रारंभ करत आहोत त्याआधी आम्हाला परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळाच्या सदस्यतेचे फायदे स्पष्ट करावेसे वाटतात, जे अश्या लोकांना उपलब्ध आहेत जे US$१० किंवा जास्त देणगी देतात; व त्याच बरोबर आमच्या देणगीदारांची प्रशंसा इतर कोणत्या पद्धतीने आम्ही करतो ह्याचे सुद्धा वर्णन करायचे आहे.

आम्ही हे जाणतो की आम्हाला भेट देणारे अनेक जण येत्या मोहीमेमध्ये देणगी देऊ शकणार नाहीत; व आमच्या समुदायाचा प्रत्येक सदस्य मग त्यांचे योगदान आर्थिक असो वा त्यांच्या स्वयंसेवक कार्यकाळातून, सर्जनशील कार्यातून, विकी लेखातून, दिलेल्या टाळ्यांमधून, किंवा प्रोत्साहनाच्या टिप्पण्यांमधून असो, ते आम्हाला मौल्यवान आहे यांवर आम्हाला विशेष भर द्यायचा आहे.

ज्यांना देणगी देणे शक्य आहे, त्यांच्या करिता लाभ हे फक्त US$१० ने सुरू होतात. प्रत्येक US$१० किंवा अधिक ची देणगी ही परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळाचे दिनदर्षिकेच्या एक वर्षाचे सदस्यत्व मिळवून देते. परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळाच्या सदस्यांना OTW संचालक मंडळाच्या, जे OTW चे दैनंदिन कार्य व धोरणात्मक दिशेची देखरेख करतात, त्यांच्या वार्षिक निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा हक्क मिळतो. पुढची निवडणूक या वर्षी ऑगस्ट मध्ये नियोजित आहे. निवडणूक प्रक्रिये बाबत अधिक माहिती आमच्या निवडणूक वेबसाईट वर बघू शकता.

OTW च्या सदस्यांना एक वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक माध्यम चिन्ह सुद्धा प्राप्त होते, जे ते त्यांच्या निवडीच्या साईट्स वर वापरु शकतात; आणि आमच्या दीर्घकालीन देणगीदारांना तीन, पाच, आणि दहा वर्षांच्या अखंड समर्थनाबद्दल बक्षीस म्हणून वैशिष्ट्यपूर्ण धन्यवाद भेटी देणे ही आम्हाला शक्य झाले आहे. ह्या वैशिष्ट्यपूर्ण धन्यवाद भेटींबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी ही प्रारंभ पोस्ट बघा .

नेहमीप्रमाणे, OTW ला विशिष्ट रक्कमेची देणगी देणाऱ्यांना आमच्याकडे विविध धन्यवाद भेटी उपलब्ध आहेत. या मोहीमेमध्ये, आम्ही दोन नव्या भेटी उपलब्ध करून देण्यास उत्सुक आहोत: एक नवीन स्टिकर संच, जो आपण US$४० किंवा अधिक देऊन निवडू शकता, आणि एक वैशिष्ट्यपूर्ण पत्त्यांच्या कॅट. प्रत्येक पत्त्याच्या पानावर एक रसिक-संज्ञा दर्शविलेली असेल जी आपल्याला Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) मधील टाचणखुणांमध्ये बघायला मिळते. आम्हाला अशी आशा आहे की पत्त्यांचे डाव खेळण्याबरोबरच, आपण हे पत्ते स्वतःसाठी किंवा मित्रांसाठी जागच्याजागी सर्जनशील आव्हाने निर्माण करण्यासाठी सुद्धा वापराल. आपण काय निर्माण करता हे पाहण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत! हा पत्त्यांचा कॅट US$१०० किंवा अधिक देणगीदारांना उपलब्ध असेल. आमच्या या व इतर धन्यवाद भेटवस्तूंबद्दल अधिक माहिती आमच्या देणगी पृष्ठावर उपलब्ध आहे.

सचित्र खेळायचे पत्ते, प्रत्येकावर एक रसिक-संज्ञा दर्शविलेली आहे: "सर्वजण जिवंत राहतात, कोणीही मरत नाही" हे एका झाडाच्या फांद्यांवर लिहिलेले आहे, "शत्रुत्वातून प्रेमाकडे" हे तालवारींनी सजविलेले आहे, याची आद्याक्षरे "अजून काम चालू आहे" सचित्र आहेत, आणि शेवटचे पान, "मंद आंच", जळत्या ज्योतीवर समाप्त. एक उलटे पान मागील भागावरचे चित्र दाखविते, AO3 लोगो सकट.

जर एवढी रक्कम आपल्याला शक्य नसेल, तर चिंता नसावी. आपण छोट्या, आवर्ती देणग्या देऊन ठरलेली किंमत जोडू शकता. आमच्या आवर्ती देणग्या पृष्ठाला भेट द्या व आपल्याला सोयीच्या रक्कमेची आणि आवर्ती कालावधीची देणगी सेट करा. आपल्या देणगी पावतीवर आपल्या निवडीच्या धन्यवाद भेटवस्तू ला कसे नोंदवावे या बद्दल सूचना असतील. ती भेटवस्तू बाजूला ठेवली जाईल आणि, एकदा आपल्या देणग्या नियुक्त स्तरावर पोहोचल्या, की ते आपल्याला पाठविले जाईल.

जर आपण US मध्ये असाल, जिथे OTW एक नोंदणीकृत ना-नफा संस्था आहे, तर आपण आपली देणगी नियोक्ता सम-रक्कम जोडणे योजनेतर्फे द्विगुणित करू शकाल. आपल्या कामाच्या जागी असे काही देऊ केले जाते का हे शोधून काढण्यासाठी आपल्या HR विभागाशी बोला.

OTW ला प्राप्त झालेल्या मागील देणग्या कुठे खर्च झाल्या आहेत हे शोधून काढण्यासाठी आमची अर्थसंकल्प पोस्ट बघा. आणि परत एकदा, जर आपण देणगी देऊ शकत असाल तर आमचे धन्यवाद स्वीकारा आणि आमच्या देणगी पृष्ठावर जाण्यासाठी यावर क्लिक करा.


OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ पहा.

Event

Comments are closed.