एप्रिल २०२२ सदस्यता ड्राईव्ह: आपल्या सहकार्यासाठी धन्यवाद

परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळाची (OTW) एप्रिल सदस्यता ड्राईव्ह संपली आहे आणि आम्हाला सांगायला खूप आनंद होत आहे की आम्ही आमचे US$40,000.00 चे निधी उभारण्याचे ध्येय पार केले आहे, आणि एकूण US$275,724.51 उभारले आहेत, 84 देशांमधील 7,528 लोकांच्या देणग्यांमुळे. आम्ही विशेषतः ह्या बातमीने खुश आहोत की 5,810 देणगीदारांनी त्यांची OTW ची सदस्यता पुन्हा चालू केली आहे किंवा नव्याने चालू केली आहे.

आमच्या जागतिक समुदायातील सर्वांचे खूप खूप आभार ज्यांनी ड्राईव्ह दरम्यान शेयर आणि पोस्ट केले आणि देणग्या दिल्या. आपले सहकार्य आमच्या चालू मिशन ला महत्व देते: त्यांच्या असंख्य रूपांमध्ये, सर्व रसिक कृतींच्या आणि रसिकसंस्कृतींच्या इतिहासाला उपलब्ध करून देणे आणि जतन करणे रसिकांच्या रुचीची सेवा करण्यासाठी. आम्हाला ह्याचा आनंद आहे की हे आपल्यासाठी तितकेच महत्वाचे आहे जितके आमच्यासाठी.

आणि जर आपण ड्राइव्ह बद्दल आत्ताच ऐकले असेल तरी काळजी करू नका! OTW वर्षभर देणग्या स्वीकारते, आणि आमचे सर्व सदस्यता परिलाभ आणि धन्यवाद भेटी आपण जेव्हा देणगी द्याल तेव्हा उपलब्ध असतील.


OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ पहा.

Event

Comments are closed.