एप्रिल २०२१ ड्राईव्ह: आपल्यासाठी टाळ्या

परिवर्तनात्मक कार्यांची निर्मिती उत्साहवर्धक करून व त्याचे जतन करून रसिकगटांची सेवा करण्याच्या मिशन सह, रसिकांनी रसिकांसाठी OTW(परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) २००७ साली स्थापित केली. चौदा वर्षांनंतरही, आमची वचनबद्धता अटळ आहे. जगभरातील रसिक-शत्रु कायद्यांच्या विरोधात केलेली कायदेशीर वकिली असो, धोक्यात असलेल्या रसिक-कार्यांचा बचाव, रसिक इतिहास मुद्रित करणे, रसिक-अभ्यासाच्या शिष्यवृत्तीसाठी स्थळ प्रदान करणे असो, व आपली जुनी वा नवीन रसिक-कार्य स्थपित करणे असो, रसिकांचा व त्यांनी निर्मित केलेल्या रसिक-कार्यांचा बचाव करण्यास OTW सतत कार्यरत आहे.

आपल्या मदतीशिवाय आम्हाला हे करणे शक्य नाही. जसे आम्ही दर एप्रिल व ऑक्टोबर मध्ये करतो, पुढच्या तीन दिवसांदरम्यान आम्ही आपणास OTW ला सामील होण्याचे आणि आमच्या कार्यास देणगी देऊन समर्थन देण्याचे आवाहन करीत आहोत. या वेळी देणगी देणे आपल्याला शक्य नसेल, तर आमच्या ड्राइव्ह ची बातमी आपल्या रसिकगट नेटवर्क मध्ये इतरांपर्यंत पोहचवणे कृपया विचारात घ्यावे, व कृपया हे जाणून घ्या कि आपण कोणत्याही पद्धतीने OTW साठी वचनबद्धता दाखवलीत तरी आपल्या सहभागाची व उत्साहाची आम्ही नेहमीच दाद देतो.

आमच्या देणगीदारांच्या औदार्याबद्दल आमची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, आम्ही आमच्या कृतज्ञता भेटींच्या संचात नवीन भर घातली आहे. US$४० वा अधिक देणगी दिल्यावर आपण इंद्रधनुष्य टाळ्या स्टिकर संच प्रतिपादित करू शकता. होय, आपण आता अखेर आपल्या मित्रांना, पाळीव प्राण्यांना, आणि घरगुती वस्तूंना टाळ्या देऊन आपली कृतज्ञता व्यक्त करू शकता!

सहा स्टिकर्स, प्रत्येकात AO3 चिन्ह, पाच इंद्रधनुष्य-रंगाच्या हार्ट्सच्या कमानी बरोबर. चिन्ह लाल केशरी, पिवळे, हिरवे, निळे आणि जांभळ्या रंगात चित्रित असेल.

लक्षात असुद्या कि, जर आपण या स्तराची देणगी देऊ शकत नसाल पण तरी आपल्याला ही किंवा इतर कृतज्ञता भेट प्रतिपादित करावयाची असेल, तर आपण ते नियमित पणे, आमचे आवर्ती देणगी पृष्ठ याच्या मार्फत, छोट्या रक्कमेची देणगी देऊन करू शकता. फक्त, आपण आवर्ती देणगी स्थापित केल्यावर एकदा आमच्या अर्थपुरवठा व सदस्यता समिती संघ यांना संपर्क करा व आपल्यासाठी कोणती भेट जतन करायची आहे हे त्यांना सांगून ठेवा. ते आपल्या आवडीच्या कृतज्ञता भेटीच्या दृष्टीने चालती बेरीज मोजावयास सुरुवात करतील.

US$१० व त्यावरील देणगी देणगीदाराला OTW सदस्यतेसाठी सुद्धा पात्र बनवते. सदस्य एक वैशिष्ट्यपूर्ण चिन्ह प्राप्त करतील जे आपण आपल्या Archive of Our Own – AO3 (आपला स्वत:चा संग्रह) खात्याबरोबर किंवा आपल्या सामाजिक माध्यमांवर वापरू शकता. आणखी महत्त्वाचे म्हणजे, सदस्यता आपल्याला OTW च्या संचालक मंडळाच्या वार्षिक निवडणूकीत मतदान करण्यास पात्र बनवते. सदस्यता व मतदानाबद्दल अधिक माहितीसाठी हे बघा.

युनाईटेड स्टेटस् मधील समर्थकांसाठी, आपल्या देणगीस मोल प्रदान करण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे नियोक्ता देणगी जुळवणे. अनेक नियोक्ता आपल्या कर्मचार्यांनी समर्थित धर्मादाय कार्यांना समान देणगी देतात: आपल्या नियोक्त्याशी बोलून हा लाभ ते देऊ शकतील का हे बघावयास काय हरकत आहे?

आपण इथे प्रत्येक ड्राईव्ह ला आमच्या स्थापनेपासून असाल वा ही आपली पहिली-वहिली ड्राईव्ह असेल त्यानी फारसा फरक पडत नाही, आम्ही आपल्या समर्थनासाठी व गुंतवणुकीसाठी कृतज्ञ आहोत. चला एकत्र येऊन ही ड्राईव्ह यशस्वी बनवूया: व आपल्याला शक्य असल्यास, आज देणगी द्या!


OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी,भाषांतर पृष्ठपहा.

Event

Comments are closed.