एप्रिल २०२१ ड्राईव्ह: आपल्या समर्थनासाठी धन्यवाद

OTW(परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) साठी असलेली एप्रिल सदस्यता ड्राईव्ह समाप्त झाली आहे, त्यामध्ये सहभागी झालेल्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत. आम्ही अचंबित व कृतज्ञ आहोत कि ड्राईव्ह च्या दरम्यान, आम्ही आमच्या US$५०,००० ध्येयाला मागे टाकून ८४ देशांमधील ९,११० देणगीदारांकडून US$२६४,९१८.८५ जमा केले. आम्ही आमची सदस्यताही १६,८४२ एवढी वाढवली. आपण सर्वजण अफाट आहात: धन्यवाद!

आम्हाला विशेषत: आमच्या OTW सदस्यांचे मनापासून आभार मानावयाचे आहेत. या ड्राईव्ह च्या दरम्यान, आमच्याकडील ४,३४८ देणगीदारांनी OTW सदस्यता निवडली. आपल्या वर्षानुवर्षे दिलेल्या देणग्यांबद्दल धन्यवाद. आपल्याविना, आमच्या प्रकल्पांना निधी प्राप्त झाला नसता, आपण खरोखरच तो खड्ग आहात ज्यावर OTW बांधले गेले आहे. आमची कृतज्ञता दाखवण्यासाठी, आमच्याकडे आता सदस्यता बक्षिस कार्यक्रम आहे. तीन, पाच व दहा वर्षांच्या OTW सदस्यत्वानंतर, सदस्य निवडक भेटी हे प्राप्त करण्यास पात्र ठरतील! तसेच, आमचे OTW सदस्यच आमच्या संचालक मंडळासाठी मतदान करू शकतात. आमच्या आगामी निवडणुकांबद्दल बातमी लवकरच प्रसारित केली जाईल.

आमच्या स्वयंसेवक, ज्यांनी सर्व सुरळीत पार पाडण्यासाठी खूप मेहनत घेतली, त्यांच्या शिवाय ही ड्राईव्ह शक्य झाली नसती. आपल्या मदतीसाठी आपले आभार! ज्यांनी ड्राईव्ह बद्दल बोलबाला केला, ट्विट केले व पोस्ट केले त्या सर्वांपर्यंत आम्हाला आमची कृतज्ञता पोहोचवायची आहे. आपल्या समर्थनामुळे खरा फरक पडला. खूप खूप धन्यवाद!

आणि सरतेशेवटी: ही ड्राईव्ह अधिकृतपणे संपली आहे, पण आपण वर्षभर देणगी द्या हे करून OTW मध्ये सामिल होऊ शकता. आपल्याला पुढील निवडणुकांमध्ये मतदान करण्यास पात्र होण्यासाठी ३० जून, २०२१ पर्यंत वेळ आहे!


OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ पहा.

Announcement, Uncategorized @mr

Comments are closed.