
फक्त एक आठवडा उरला आहे आठव्या आंतरराष्ट्रीय रसिक-कार्य दिवसासाठी (किंवा IFD साठी, त्याचे इंग्रजी लघुनाम) आणि OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) कडून आपल्या सर्वांसाठी खूप काही राखून ठेवले आहे! कृपया खालील उपक्रमांवर नजर फिरवा व मजेमध्ये सहभाग घ्या.
1. रसिक-कृती आव्हान
या वर्षीच्या IFD चा विषय ‘रसिक-गट क्लासिक्स’ असा आहे आणि मागच्या महिन्यातील पोस्ट नुसार, आम्ही आपल्याला आपल्या आवडत्या रसिक-गटामधील आपण क्लसिक संबोधत असलेल्या कार्यांवर आधारित पालूपदे, रिमिक्स किंवा आदरांजली देणाऱ्या रसिक-कृती निर्माण करण्यामध्ये भाग घ्यायला आमंत्रित करीत आहोत. आपण आपल्या आवडत्या कार्यांवर मेटा हि लिहू शकता! आम्ही आपल्याला सामाजिक माध्यमांवर #IFD2022 किंवा #IFDChallenge2022 हॅशटॅग्स वापरून, किंवा जर आपण Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) वर पोस्ट करीत असाल तर ‘आंतरराष्ट्रीय रसिक-कार्य दिवस २०२२’ मध्ये आपल्या निर्मित्या सादर करण्याचे आमंत्रण देतो. सहभागी होण्यासाठी अजून भरपूर वेळ आहे आणि आपण काय निर्मित करता हे बघण्यास आम्ही उत्सुक आहोत!
२. अभिप्राय फेस्ट
१३ फेब्रुवारी ला आम्ही पोस्ट सादर करू जिथे आम्ही आपल्याला आपल्या आवडत्या क्लासिक रसिक-कृतींच्या शिफारसी आमच्या पर्यंत पोहोचवण्याचे निमंत्रण देऊ. आत्तापासूनच विचार करून ठेवा व आपल्या सहकारी रसिकांबरोबर शेयर करण्यासारख्या रेक्स आम्हाला पाठवा!
३. फॅनलोर आव्हान (इंग्रजी मध्ये)
फॅनलोर, OTW चे विकी जे रसिक इतिहास आणि संस्कृतीने परिपूर्ण आहे इथे जा व IFD च्या उत्सवात सहभागी व्हा! फॅनलोर आव्हान एका आठवड्यासाठी चालू राहील आणि त्यामध्ये प्रत्येक दिवशी पूर्ण करण्यासाठी विविध संपादकीय आव्हाने असतील. रसिक-कृतींवरील आपल्या प्रेमाचा सन्मान करण्यासाठी आपल्या सहकारी रसिकांपर्यंत आपले ज्ञान पोहोचवण्याहून अधिक चांगला कोणता मार्ग असू शकतो?
४. खेळ आणि रसिक गप्पा (इंग्रजी मध्ये)
फेब्रुवारी १४ २१.०० UTC ते फेब्रुवारी १६ ०३.०० UTC पर्यंत आम्ही OTW च्या स्वतःच्या डिस्कॉर्ड सर्वर वर गप्पा-खेळ सत्र आयोजित करीत आहोत. इंग्रजी-भाषित OTW स्वयंसेवक एक खेळांची मालिका व्यवस्थापित करतील ज्यामध्ये रसिक-गट प्रश्नमंजुषा, २० प्रश्न, यादी-निर्मिती आव्हाने आणि अजून बरेच काही सामील असेल. आपल्या आवडत्या रसिक-गटामधील इतर रसिकांबरोबर जुडण्याची आणि आपला उत्साह त्यांच्या बरोबर वाटण्याची ही एक अप्रतिम संधी आहे. आम्ही दूवा व संपूर्ण वेळापत्रक त्याच दिवशी पोस्ट करू व म्हणून आपल्या रोजनिशी मध्ये तारीख नोंद करून ठेवा व पुढील माहितीसाठी पुन्हा भेट द्या!
OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ पहा.