Archive of Our Own (आमचा स्वतःचा संग्रह)

Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) ही रसिककथा, रसिककृती, रसिकचित्रफीत आणि रसिकध्वनिफीतसारख्या परिवर्तनवादी रसिककृतींसाठी एक गैर-व्यावसायिक आणि ना-नफा केंद्रीय होस्टिंग साइट आहे. AO3 ही संपूर्णपणे रसिक-निर्मित आणि रसिकांनी चालवलेली आहे, जिथे रसिक-सर्जनशीलतेला कायदेशीरपणा आणि सामाजिक मूल्यासाठी केस स्पष्ट करण्यासाठी OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) च्या वकिलीचा फायदा होऊ शकतो.

AO3 ने नोव्हेंबर २००९ मध्ये ओपन बीटामध्ये प्रवेश केला आणि फेब्रुवारी २०१४ मध्ये १० लाख अपलोड केलेल्या रसिककृतींपर्यंत पोहोचले. जुलै २०१८ मध्ये AO3 ने ४० लाख अपलोड केलेले रसिककृती पास केले. २०१९ मध्ये ते १०.५ लाखाहून अधिक नोंदणीकृत वापरकर्त्यांद्वारे वापरले जाते आणि ३०,००० हून अधिक घटांमध्ये त्याचे रसिककृत्या आहेत.

AO3 संपूर्णपणे रसिकगटमधील स्वयंसेवकांनी तयार केले आणि डिझाइन केले गेले आहे. आमच्या अनेक स्वयंसेवकांनी प्रकल्पावरील त्यांच्या कामातून कोडींग, डिझाइन आणि दस्तऐवजीकरण कौशल्ये आत्मसात केली आहेत. साइटचे मुक्त-स्रोत सॉफ्टवेअर सध्या GitHubयेथे सादर केले आहे. AO3 च्या सर्व्हरना संपूर्णपणे OTW ला देणगी देऊन निधी दिला जातो. वापरकर्ते पैसे देत नाहीत आणि साइटवर कोणत्याही जाहिराती नाहीत.

AO3 च्या काही उल्लेखनीय वैशिष्ट्यांमध्ये हे समाविष्ट आहे:

  • एकाधिक स्वरूपामध्ये रसिककृतीचे एक-क्लिक डाउनलोड (ePub, HTML, Mobi, PDF)
  • मुक्तघडण टाचणखुणा सिस्टम जी रसिककृतीच्या निर्मात्यांना वर्गीकरणासाठी त्यांचे स्वतःचे टाचणखुणा परिभाषित करण्यास अनुमती देते
  • टिप्पणी, प्रशंसा आणि वाचनखूण प्रणाली
  • वापरकर्त्यांसाठी रसिककृत्या प्रकरणानुसार किंवा संपूर्णपणे पाहण्यासाठी पर्याय, आणि मालिकेत रसिककृत्या लिंक करा
  • रसिककृती संग्रह आणि आव्हाने सादर करणे
  • आधी इतरत्र नोंद केलेल्या रसिककृतींची आयात करणे

प्रकल्पावरील अधिक तपशील माहिती आढळू शकते वाविप्र , AO3 आगामी नियोजन आणि AO3 बातम्या नोंद. AO3 कडून बातम्या देखील उपलब्ध आहेत ट्विटर आणि टंबलरयेथे.