आमचे प्रकल्प

Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह)
AO3 एक अव्यावसायिक व एक ना-नफा होस्ट आहे ज्याच्यावर तुम्ही रसिककथा व आदि परिवर्तनात्मक कामे प्रदर्शित करू शकता. हे सगळ एका मुक्त स्रोत दस्ताऐवज सॉफ्टवेअर बरोबर केला जातं.

Fanhackers
OTWनी (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी)एक ब्लोग प्रकाशित केला आहे ज्याच्यावर तुम्ही रसिक मेटा तोपिच्स वर आणि रसिक दृष्टिन वर चर्चा करू शकता.

Fanlore
Fanlore (फॅनलोर) एक रसिकगण विकी आहे, जे रसिकगण आणि रसिक्गानांच्या रसिक्कृत्यांच्या इतिहासाची राखण ठेवते .

Fan Video and Multimedia (रसिकचित्रफी व मल्टीमीडिया)
आमचे मलटीमीडिया प्रोजेक्टसमध्ये सध्या Fan Video Roadmap (रसिकचित्रफीत नियोजन), Vidding History project (रसिकचित्रफीतेतिहास) यासह Test Suite of Fair Use Vids (सुजाण वापराची उदाहरणे) आणि अजून अनेक साधने उपलब्ध अहेत. जर तुम्ही रसिकचित्रफीत बनवणारे आहात, तर तुम्ही हे वापरू शकता व तुम्हाला टिप्पण्या मिळतील. या टिप्पण्या तुम्हाला होस्टिंग व तुमचा विदिओ तुम्हाला AO3वर कसा एम्बेड करता येईल ह्या गोष्टी सांगतील

Legal Advocacy (कायदेविषयक मदत)
OTW रसिक्कृत्यांना व्यावसायिक शोषण व कायदेशीर आव्हानान पासून वाचवते.

Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प)
Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प) एक असा प्रकल्प आहे जो अश्या प्रकल्पांना मदत करतो जे कुठल्याही कारणांमुळे बंद पडू शकतात. Open Doorsचे उपक्रम आहेत: १.Fan Culture Preservation Project (रसिकसंस्कृतिजतन प्रकल्प), जे रसिक्मासिके आणि इत्यादी नॉन डिजिटल रसिक्साहीत्य जप्तं. आणि २. GeoCities Rescue Project (जीओसिटीज् रेस्क्यू प्रकल्प).

Transformative Works and Cultures – TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती)
TWC एक अकॅडेमिक जोउर्नल आहे जे रसिक्साहित्यावर स्कोलार्शिप देते.