
चांगली बातमी मिळालं : आम्ही सफल झाले ! एप्रिल सदस्यता ड्राइव्ह संपले आहे आणि एकत्रितपणे आम्ही आमच्या US$ 130,000 च्या निधी उभारण्याचे उद्दिष्ट ओलांडले आहे. प्रत्यक्षात, 86 देशांमधील 9,966 दात्यांनी आम्हाला US$ 245,655 च्या मोठ्या प्रमाणात वाढवण्यास मदत केली आहे. हे आमचे सर्वात यशस्वी सदस्यता ड्राइव्ह आहे आणि आम्ही आपल्या सर्व समर्थनाबद्दल चकित आणि कृतज्ञ आहोत, धन्यवाद!
OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) आणि त्याच्या सर्व प्रकल्पांना समर्थन देण्यासाठी ही निधी महत्त्वपूर्ण भूमिका निभावतील – फॅनलोर, Legal Advocacy (कायदेविषयक मदत), Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), Transformative Works and Cultures – TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती), and Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) – जे आम्हाला रसिककृती , रसिकसंस्कृती आणि रसिक-इतिहासाचे संरक्षण करण्याचे आमचे कार्य सुरू ठेवण्याची अनुमती देते. आपला पाठिंबा खूपच महत्वाचा आहे आणि, दान केलेल्या, सिग्नलला उत्तेजन दिलेला आणि आम्हाला प्रोत्साहित दिलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आम्ही खूप आभारी आहोत. आपण सर्वोत्तम आहात!
जर आपण ड्राइव्ह गमावले आणि यादी आपण योगदान देऊ इच्छित असल्यास, आम्ही दरवर्षी देणगी स्वीकारतो.
OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदेविषयक मदत सहित अनेक प्रकल्पांचे नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन चालवत, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दात्याने-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाइटवर स्वयंसेवक अनुवादकांच्या टीमबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, ज्यांचेसाठी हे पोस्ट अनुवादित आहे,भाषांतर पृष्ठपहा.