आपले समर्थन OTWला रसिककृती संरक्षित करण्यास मदत करते

सर्व प्रकारच्या रसिककृती आणि रसिक-इतिहास वाचवणे आणि प्रसारित करणे, OTWचा (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) मुख्य उद्दीष्ट आहे. अशा वेळी जेव्हा इतर प्लॅटफॉर्म प्रतिबंधित आणि वापरकर्ता-व्युत्पन्न सामग्री लपवत असतात, आमची ही मोहिम नेहमीपेक्षा अधिक महत्वाची आहे. आम्ही हे कार्य आपल्या सशक्त स्वयंसेवक शक्तीच्या कार्याद्वारे आणि आपल्या उदार देणग्यांच्या समर्थनाद्वारे जिवंत ठेवतो.

OTW रसिककृती आणि रसिक-इतिहास संरक्षण कसे करते? येथे काही उदाहरणे आहेत:

आमच्या Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प) गमावली जात रसिक-सामग्रीचे संरक्षण करण्यासाठी समर्पित आहे. ऑनलाइन संग्रहण बचाव प्रकल्पाद्वारे, डिजिटल संग्रहण आयात केले जातात आणि त्यांची सामग्री Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) मध्ये होस्ट केली जाते. 2018 मध्ये, रसिकमुक्तद्वार प्रकल्पाने 11 संग्रहांचे आयात पूर्ण केले. गैर-डिजिटल रसिककृती साठी, रसिकसंस्कृती प्रेझर्वेशन प्रोजेक्ट आहे, जो OTW आणि आयोवा विद्यापीठातील स्पेशल कलेक्शन विभाग यांच्यातील संयुक्त उपक्रम आहे, जो फॅनझाइन्स, रसिककला आणि इतर भौतिक दस्तऐवजांचे रक्षण करते.

फॅनलोर एक विलक्षण विकी आहे जो रसिक-इतिहासाच्या सर्व पैलूंचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी समर्पित आहे. त्याची सर्व सामग्री जगभरातील अनेक चाहत्यांनी तयार केली आहे.

फॅनलोरवर गोष्टींचे दस्तऐवजीकरण करणे—जर ते रसिक-समुदाय, रसिक चर्चा, वैयक्तिक रसिककृती किंवा इतर काहीही असो—निश्चित करते कि, जर पहिला आवृत्ती गमावले असेल, तरीही आम्हाला त्याची आठवण होणार.

OTWचा Legal Advocacy (कायदेविषयक मदत) प्रकल्प रसिककृतीना व्यावसायिक शोषणापासून संरक्षण करण्यास मदत करते. आमचे कायदेविषयक समिती रसिककृतीसाठी कॉपीराइट कायद्यांकडून सुजाण वापर सवलत प्राप्त करण्यास मदत करते, ज्यामुळे चाहते, कमाई न करता किंवा महामंडळांनी ते काढून घेतल्याशिवाय, रसिककृती तयार आणि सामायिक करू शकते. ते जगभरातील सरकारांना धोरणे टिप्पण्या आणि पत्र सादर करतात, आणि कायद्याच्या निर्मितीदरम्यान चाहत्यांचे व रसिककृतींचे समर्थन करतात. ते रसिकगण-संबंधित कायद्यातील विकासाबद्दल शैक्षणिक सामग्री पण तयार करतात, जसे की गेल्या वर्षाच्या पोस्ट टंबलरच्या सेवा अटींमध्ये बदल कशा प्रकारे रसिककृती वर प्रभाव पाडतात हे स्पष्ट करते.

आपल्या समर्थनाशिवाय, हे शक्य नव्हता. आमच्या अलीकडील बजेट पोस्टनुसार, आमच्या प्रकल्पांना सर्व्हर, सॉफ्टवेअर आणि कायदेशीर शुल्कासारख्या गोष्टींसाठी निधी आवश्यक आहे. कृपया आमचे कार्य चालू ठेवण्यात मदत करण्यासाठी आज देणगी द्या .


OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदेविषयक मदत सहित अनेक प्रकल्पांचे नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन चालवत, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दात्याने-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाइटवर स्वयंसेवक अनुवादकांच्या टीमबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, ज्यांचेसाठी हे पोस्ट अनुवादित आहे,भाषांतर पृष्ठपहा.

Event

Comments are closed.