
२००९ मध्ये आमच्या स्थापने पासून, OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) हे रसिकांनी घडविले व चालविले आहे. आज पर्यंत, हे खरे राहिले आहे: OTW संघटना हि रसिकांतर्फे रसिकांसाठी आहे, आणि तेच रसिक OTW ला प्रत्येक स्तरावर ताकदवान बनवितात. आमच्या प्रत्येक समितीमध्ये, स्वयंसेवक हे आमचे प्रकल्प नीट चालावेत व पुढे जावेत या साठी आवश्यक कार्य पार पाडतात. त्यांच्याशिवाय OTW अस्तित्वात नसली असती, आणि आम्ही त्यांच्या अत्यावश्यक कार्यासाठी अत्यंत कृतज्ञ आहोत.
जशी OTW मोठी होत आहे, तसे आमचा स्वयंसेवक दल सुद्धा त्याबरोबर विकसित होत आहे. या वर्षी आम्ही १००० स्वयंसेवक संख्या पार केली आहे- एक रोमहर्षक आकडा! ह्याव्यतिरिक्त आमचे आधीचे स्वयंसेवक आहेत ज्यांनी आमच्या समर्थनासाठी त्यांचा वेळ दिला आहे.
या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिनानिमित्त, आम्ही आमच्या सर्व स्वयंसेवकांना, भूत आणि वर्तमान, साजरे करू इच्छितो. तुमचे योगदान आम्हाला दिसत आहे व ते आमच्यासाठी मौल्यवान आहे. आपल्या सर्व कार्याबद्दल धन्यवाद!
OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ पहा.