आंतरराष्ट्रीय रसिक-कार्य दिन २०२१ येत आहे

जवळजवळ ती वेळ आली आहे: आंतरराष्ट्रीय रसिक-कृती दिन (किंवा “IFD” स्वल्प रुपामध्ये, त्याचे इंग्रजीतील एक्रोनिम) हा लवकरच येत आहे! दर वर्षी १५ फेब्रुवारी ला असलेल्या या दिनी, आम्ही खूप काही नियोजित केले आहे आणि आपण हा साजरा करण्यास आम्हास सामिल व्हाल अशी आम्ही आशा करतो!

आंतरराष्ट्रीय रसिक-कृती दिन म्हणजे काय?

OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) ने २०१४ मध्ये सुरू केलेला व पहिल्यांदी २०१५ मध्ये साजरा केलेला, आंतरराष्ट्रीय रसिककृती दिन हा जगभरातील रसिक-कार्यांना त्यांच्या अनंत विविधतांमध्ये आणि अविश्वसनीय प्रतिभांमध्ये साजरा करण्याचा दिवस आहे. रसिक-कथा, रसिकध्वनिफीत, ॲनिमेशन, रसिक-चित्रफित, पाॅडकास्ट, रसिक-कला असो वा इतर काहीही जे आपल्याला सुचत असेल, आम्हाला या संधीद्वारे निर्मात्यांनी व रसिक दोघांबरोबर वेळ घालवायचा आहे.

रसिक-कृती आव्हान: आपल्या आवडते व कमी माहितीतील रसिकगट/रसिक-कृती शेर करा!

या वर्षी, कारण Archive of Our Own – AO3 (आमचा स्वत:चा संग्रह) ने नुकतेच ४०,००० रसिकगट पार केले, आम्हाला कमी-माहितीतील गोष्टी साजऱ्या करावयाच्या आहेत, सूक्ष्म-रसिकगट असो ज्यामध्ये नवीन लोकांनी सामिल व्हावे असे आपल्याला वाटत असेल, एखादे कार्य वा रसिकगट जो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास पात्र असेल, किंवा प्रचंड मोठ्या रसिकगटातील असे कार्य जे आपल्या मते अजून प्रेम मिळण्यास पात्र असेल – या मधील काहीही! आत्तापासून ते #IFD2021 पर्यंत आम्ही आपल्याला आपल्या आवडीची कमी-माहितीतील कार्य किंवा रसिकगट आपल्या सोशल मीडियावर #IFDChallenge2021 हा हॅशटॅग वापरून शेर करण्यास निमंत्रित करीत आहोत, आणि आम्ही आमच्या आवडीपैकी काही आमच्या सोशल मीडिया चॅनल्स वर ८ – १५ फेब्रुवारी दरम्यान रिब्लाॅग करू.

रसिक-कृती निर्मात्यांनी छोटे रसिकगट, अज्ञात पात्रे, कमी माहितीतील जोड्या व तत्सम शोधून त्यांच्यासाठी कार्यांची निर्मिती केली तर आम्हाला तेही खूप आवडेल! आत्ता व १५ फेब्रुवारी च्या मध्ये आम्ही निर्मात्यांना त्यांच्यासाठी नवीन असलेले छोटे रसिकगट, जोड्या, पात्रे व इतर शोधण्याचे व त्यांच्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय ररसिक-कृती दिन २०२१’ टाचणखूण वापरून रसिक-कार्य निर्माण करण्याचे आव्हान करीत आहोत, ज्यामुळे आपल्या सर्वांना त्याचा आस्वाद घेता येईल!


OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ.

Event

Comments are closed.