आंतरराष्ट्रीय रसिककृती दिवस २०२४ लवकरच येत आहे!

वेळ किती पटकन जातो! आम्ही OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) मध्ये आंतरराष्ट्रीय रसिककृती दिनाचा दहावा वर्धापनदिन सुद्धा साजरा करतोय.

दर वर्षी फेब्रुवारी १५ ला, ज्या दिवशी, दहा वर्षांपूर्वी, Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) ने आपली दशलक्षावि रसिककृती साजरी केली, त्यादिवशी रसिकगत एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय रसिककृती दिवस आणि रसिककृतींचे विविध प्रकार– कथा, कला, चित्रफीत, मासिके, मेटा, आणि अजून बरेच–आणि त्यांचे जगभरातील रसिक समुदायांमधील महत्व साजरा करतात.

आम्हाला आपला रसिकगटांमधील अनुभव ऐकायला खूप आवडेल–रसिक म्हणून, निर्माते म्हणून, समुदायाचा एक हिस्सा म्हणून. ह्या आंतरराष्ट्रीय रसिककृती दिवस थिम आहे १०: आपल्यासाठी रसिकगटाबद्दलच्या दहा सगळ्यात महत्वाच्या गोष्टी सांगा, रसिकगटामध्ये घालवलेल्या मागच्या दहा वर्षातले हायलाईट सांगा, किंवा, आपल्याला जर जास्त ओढ वाटत असेल तर आपल्या रसिकगटांमध्ये घडलेल्या दहा मजेदार, रोमांचक, किंवा लक्षणीय क्षणांबद्दल सांगा.

आम्ही रसिकांनी शेयर केलेल्या गोष्टींवर नजर ठेवणार आहोत, त्यामुळे आपल्या पोस्ट्स ना #IFD2024 बरोबर टॅग करा आणि आम्ही त्या गोष्टी OTW न्युज च्या सोशियल मीडिया खात्यांद्वारे इतरांना सांगू.

काही आठवड्यांमध्ये आम्ही आंतरराष्ट्रीय रसिककृती दिवस २०२४ साजरा करण्यासाठी काय OTW करत आहे ह्याची घोषणा करू. पण आम्हाला हे हि जाणून घ्यायचे आहे कि आपण आणि आपले रसिकगटाचे समुदाय ह्या कार्येक्रमाचे दहावे वर्ष साजरा करण्यासाठी काय करत आहात! डिसेंबर मध्ये आम्ही आपल्याला विचारले होते कि आपले समुदाय ह्या आंतरराष्ट्रीय रसिककृती दिवसासाठी काय करत आहेत: आम्ही जानेवारी २८ पर्यंत ह्या कार्येक्रमाची माहिती आणि त्यांच्या दुवा जमा करत राहू. मग आम्ही त्या कार्येक्रमांना आमच्या वाचकांसाठी आमच्या कार्येक्रमाच्या वेळापत्रकाबरोबर बढती देऊ आमच्या वेबसाईट आणि सोशियल मीडिया च्या खात्यांद्वारे, त्यामुळे आपल्या उत्सवांची माहिती आम्हाला नक्की सांगा!

आम्हाला हा महत्वाचा टप्पा आपल्याबरोबर शेयर करायला खूप आनंद होत आहे, आणि आपण हा टप्पा साजरा करण्यासाठी काय करत आहेत हे जाणून घ्यायला आम्ही आतुर आहोत. आम्ही हे वाचण्याची वाट बघतोय कि रसिकगत आणि रसिककृती ह्यांचे तुमच्यासाठी महत्व काय आहे!


OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ पहा.

Event

Comments are closed.