आंतरराष्ट्रीय रसिककृती दिन २०२४: आपला रसिकगत काय करत आहे?

आम्हाला हे घोषित करायला उत्साहित आहोत कि आम्ही पुढच्या आंतरराष्ट्रीय रसिककृती दिनाची तयारी सुरु केली आहे – हे एक महत्वाचा प्रसंग आहे कारण हे ह्या दिनाच दहावा वर्ष असणार आहे! आम्हाला हा महत्वाचा प्रसंग आपल्याबरोबर साजरा करायला खूप आनंद होत आहे, आणि आम्हाला आपल्या सामुदायिक कार्येक्रमांबद्दल ऐकायला आवडेल.

आंतरराष्ट्रीय रसिककृती दिन, १५ फेब्रुवारी ला साजरा केला जाणारा, OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) ने २०१४ मध्ये सुरु केला होता Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) वर एक दशलक्ष रसिककृती प्रकाशित झाल्याच्या सन्मानार्थ. हा रसिककृतींच्या – कोणत्याही प्रकारच्या – महत्वाची आठवण करून देण्याचा आणि ओळखण्याचा आमचा प्रयत्न आहे – आपल्या संस्कृतीवर रसिककृतींच्या प्रभावाचे, रसिकगटांमधील आपल्या नात्यांचे, आपण मीडिया कश्या अनुभवतो ह्याचे, आणि कारण रसिककला आपले आयुष्य थोडे (किंवा खूप) सुधारतात ह्याचे महत्व. आम्हाला सर्वे रसिकगटांमधून, सर्व संस्कृतींमधून, सर्व देशांमधून, सर्व भाषांमधून, सर्व रसिकांना बोलवायचे आहे एकत्र येण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय रसिककृती दिन साजरा करणारे स्वतःचे कार्येक्रम शेयर करण्यासाठी. आपण जरी रसिककथा वाचनाच कार्येक्रम होस्ट करत असाल, किंवा एक कॉसप्ले स्पर्धा, किंवा एक रसिककला प्रदर्शन, किंवा एक २४ तासाचे कॉमिक, आम्हाला त्याबद्दल ऐकायचे आहे! आमच्याबरोबर आणि बाकीच्या समुदायाबरोबर आपला प्रसंग शेयर करून, आपण रसिकगटांच्या प्रत्येक कोर्यातल्या रसिकांची भेट घेऊ शकता आणि रसिक समुदायांचे समर्थन करू शकता एक स्वागत करणारे आणि समावेशक वातावरण बांधून.

आम्हाला अशी अशा आहे कि आम्ही आयोजित करत असलेल्या पुढच्या आंतरराष्ट्रीय रसिककृती दिनाच्या कार्येक्रमांमध्ये आपण भाग घ्याल! आम्हाला आपल्या सामुदायिक कार्येक्रमांची माहिती हा फॉर्म भरून २८ जानेवारी, २०२४ पर्यंत पाठवा. मग आम्ही फेब्रुवारी मध्ये ह्या कार्येक्रमांबद्दल इतरांना सांगू.

आमच्या जानेवारी मधील पुढील घोषणेसाठी सज्ज राहा!


OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ पहा.

Announcement, Event

Comments are closed.