आंतरराष्ट्रीय रसिककृती दिवस २०२० लवकरच येत आहे

वर्षाची ती वेळ पुन्हा असेल: आंतरराष्ट्रीय रसिककृती दिवस हे जवळजवळ येथे आहे! आम्ही १५ फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय रसिककृती दिन साजरा करतो, जे या वर्षी शनिवारीला पडेल. २०२० हा आपला सहावा वार्षिक उत्सव आहे आणि आम्ही ही परंपरा कायम ठेवण्यासाठी खूप उत्साही आहोत!

तरीही आंतरराष्ट्रीय रसिककृती दिन म्हणजे काय?

आंतरराष्ट्रीय रसिककृती दिवस ही चाहता-निर्मित सामग्री साजरी करण्याची संधी आहे, जे OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) ला स्पॉटलाइट, सामायिकरण आणि संरक्षण करण्यासाठी स्थापित केले गेले. जगभरातील अविश्वसनीय रसिकगण समुदायाचा भाग होण्यासाठी आम्ही भाग्यवान आहोत, आणि आम्ही आशा करतो की आपण बर्‍याचजण आम्ही IFD साठी तयार केलेल्या कार्यक्रमांमध्ये तसेच त्यापुढील दिवसांमध्ये सहभागी व्हाल. या दरम्यान, आम्ही नवीन रसिककृती तयार करण्यासाठी आणि गेल्या 12 महिन्यांपासून आपण भोगावे अशी काही रसिककथा , रसिककला , रसिकध्वनिफीत आणि रसिकचित्रफीत ओळखण्यासाठी आम्ही चाहते निर्माते आणि ग्राहकांकडून सहभाग घेऊ. आपण जिथे आहात तिथे आणि आपण जी भाषा बोलता तिथे आम्हाला आपल्याकडून ऐकायचे आहे!

रसिककृती चॅलेंजः आपल्या व्यक्तिरेखांचे प्रतिक्रिया कशी असेल?

# IFD2020 च्या अपेक्षेने आम्ही चाहते निर्मात्यांना एक आव्हान जारी करत आहोत. आपण या प्रॉम्प्टचा उपयोग IFDrabble, IFDrawble किंवा, आपल्याला इतर जे काही मध्यममध्ये किंवा वेगाने उपयुक्त आहेत अशा वेगवान रसिककृतीसाठी प्रेरणा म्हणून वापरत आहात हे आम्हाला आवडेल. त्यांच्यावर आता कार्य करा आणि फेब्रुवारीमध्ये Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) वर #IFDrabble’ किंवा ‘आंतरराष्ट्रीय रसिककृती दिन २०२०’ टॅग करून त्यांना ऑनलाइन पोस्ट करा. आम्ही आमच्या सोशल मीडिया चॅनेल्सवर ८ ते १५ फेब्रुवारी दरम्यान आमच्या काही (SFW!) आवडी परत पोस्ट करु.

या वर्षासाठी प्रॉम्प्ट काय आहे? ही वेळ META ची आहे! आम्हाला व्यक्तिरेखा स्वतःबद्दल रसिककृती शोधणारे पहायला आवडेल. काय होयल जर क्रोली ला गुड ओमेन्स ची रसिककला मिळाली आणि अझीराफेराफेल ला दाखवले? किंवा वोलडेमोरट हैरी पोटर चे रसिककृती शोधून युध जिंकायचे योजना जमवते? आपल्याला फक्त अश्या अनागोंदीची कल्पना येऊ शकते जी कदाचित निर्माण होऊ शकेल; परंतु सुदैवाने आमच्यासाठी, आम्हाला फक्त त्याची कल्पना करायची आहे. हे घडवून आणणे आपले काम आहे!

तर, आता आपल्या निर्मितीवर कार्य करा आणि १ फेब्रुवारीपासून कोणत्याही वेळी त्यांना ऑनलाइन पोस्ट करणे प्रारंभ करा. (टाचणखुण वापरणे लक्षात ठेवा!). आमची पुढील IFD ब्लॉग पोस्ट ८ फेब्रुवारी ला येईल, आमचे रसिककृती चॅलेंज रिपॉस्ट सुरू करुन आपल्याला पुढील काही कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करीत आहे. आम्ही नंतर आपल्याशी संपर्क साधण्यास उत्सुक आहोत!


OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदेविषयक मदत सहित अनेक प्रकल्पांचे नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन चालवत, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दात्याने-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाइटवर. स्वयंसेवक अनुवादकांच्या टीमबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, ज्यांचेसाठी हे पोस्ट अनुवादित आहे, भाषांतर पृष्ठपहा.

Event

Comments are closed.