अलगावात समुदायाचा शोध

परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ ही ना-नफा संस्था आहे जिथे जगभरातील स्वयंसेवक काम करतात. आम्ही जे पैसे मिळवतो ते सर्व आमच्या प्रकल्पांवर खर्च होतात. पण आम्ही एकटे हे करू शकत नाही. म्हणूनच, दर वर्षीच्या एप्रिल प्रमाणे, आम्ही आज आमची द्वैवार्षीक सदस्यता ड्राइव्ह सुरू करत आहोत व आमच्या वापरकर्त्यांना हे आवाहन करीत आहोत- आमच्या कामाला सहाय्य म्हणून देणगी द्या.

साहजिकच, या वर्षीचा एप्रिल हा आधीच्या वर्षांपेक्षा अनेक बाबींमधे वेगळा आहे. सध्याची जागतीक परिस्थिती अभूतपूर्व आहे व आम्ही समजू शकतो की नेहमी देणगी देणारे सध्या तसे करण्याच्या स्थिती मधे नसतील. पण आम्ही तुम्हाला आश्वासन देऊ इच्छितो की तुमच्या यापूर्वीच्या औदार्यामुळे व आमच्या अर्थ विभागाच्या अथक प्रयत्नांमुळे, या वेळी आम्ही किती पैसे जमवू शकू या वर अवलंबून न राहता, आम्ही आमच्या वापरकर्त्यांसाठी या पुढे खूप काळ हजर आहोत. तुमच्या आत्ताच्या देणग्या ह्या आमचे काम भविष्यात टिकून ठेवण्यात मदत करतील आणि आमच्या उन्नतीचे नियोजन करण्यास आम्हाला आधार देतील.

परीवर्तनात्मक रसिक-कला मंडळात, देणगी ही फक्त आर्थिक गुंतवणूकीचे प्रातिनिधीत्व करीत नाही. US$10 किंवा जास्तची देणगी ही तुम्हाला पुढच्या वर्षासाठी परीवर्तनात्मक रसिक-कला मंडळाचा सदस्य होण्यास, किंवा तुम्ही आधी देणगी दिली असल्यास तुमच्या सदस्यत्वाचे नूतनीकरण करण्यास पात्र करते. आमच्या आॅगस्ट मधील निवडणूकांमधे सदस्य मतदान करू शकतात, ज्या OTW ची विकास निती व भविष्याच्या नियोजनाचे निर्देशन करणाऱ्या संचालक मंडळाची रचना निश्चित करतात.

नेहमीप्रमाणे, पण मुख्यत्वे आता, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या समुदायासाठी तुम्ही करत असलेले प्रत्येक योगदान मूल्यवान व महत्त्वाचे आहे. तुम्ही रसिक-कार्य निर्माण करत असाल, निर्माणकर्त्यांशी टाळ्या व टिप्पण्यांच्या माध्यमातून जुळत असाल, रसिकांचा इतिहास व संस्कृतीची नोंद करण्यास मदत करत असाल, रसिक-विषयक शैक्षणिक पेपर लिहून आम्हाला ज्ञान देत असाल, तुमच्या वेळेच्या सेवेनिशी आम्हाला मदत करा, किंवा आमच्या सर्व प्रकल्पांना आर्थिक मदत करत असाल, तुम्ही आमच्या कामाचा भाग असल्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.

शक्य असल्यास, दान करा, ह्याचा विचार करा, आणि या समुदायास आज, उद्या, आणि नेहमी उत्तम आधार देण्यास मदत करा. आपण काही आठवडे किंवा महिने एकांतात घालवले असतील, पण तुमच्या प्रतिबद्धते मुळे आम्ही खऱ्या अर्थानी कधीच एकटे नसतो.


OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदेविषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दात्याने-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाइटवर. स्वयंसेवक अनुवादकांच्या टीमबद्दल किंवा ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ पहा.

Event

Comments are closed.