
२०२० चे आंतरराष्ट्रीय रसिककृती दिवसचा अभिप्राय उत्सवमध्ये आपले स्वागत आहे!
आपण आम्हाला येथे OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) ला भेट देत असाल तर आपण, आमच्यासारख्या, रसिककृती आवडतात असे म्हणणे सुरक्षित आहे. आपल्या काही आवडत्या रसिककृती साजरी करण्याची ही संधी आहे. काय करू शकते ते येथे आहे:
कमीतकमी तीन रसिककृतीची शिफारस करुन आपण त्यांना का आवडत आहात याबद्दल काहीतरी सांगत खाली एक टिप्पणी द्या. आपण गेल्या वर्षी अनुभवलेल्या सर्वोत्कृष्ट तीन रसिककृती आम्हाला सांगू शकता किंवा आपल्या शिफारसींचा थीम, ट्रॉप किंवा जोडी यांच्याशी दुवा साधू शकता. किंवा कदाचित आपण फक्त आम्हाला आठवू इच्छित असलेल्या पहिल्या तीन रसिककृती सांगू शकता.
आपण सोशल मीडियावर एक सिफारिश पोस्ट देखील करू शकता आणि येथे दुवा साधू शकता किंवा लोकांना शोधण्यासाठी #FeedbackFest टाचखूण करू शकता. लक्षात ठेवा की चाहता समुदाय, वृत्तपत्रे, संग्रहणे आणि अन्य संसाधने देखील रसिककृती आहेत, म्हणून बर्याच शक्यता आहेत!
जर आपण पहात असलेल्या काही शिफारसी तपासण्याचे ठरविल्यास, तर ज्या रसिककृतीना भेट देता त्याबद्दल टिप्पण्या, पसंती, टाळ्या किंवा इतर अभिप्राय जरूर द्या जेणेकरून आपण प्रेमाचा प्रसार करू शकाल.
तर, सुरु करूया! आपल्या शिफारसींसह टिप्पण्या विभागात जा आणि आपल्या आवडत्या निर्मात्यांना त्यांच्या रसिककृतीचा आपल्यासाठी किती अर्थ आहे हे दर्शवा!
OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदेविषयक मदत सहित अनेक प्रकल्पांचे नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन चालवत, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दात्याने-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाइटवर. स्वयंसेवक अनुवादकांच्या टीमबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, ज्यांचेसाठी हे पोस्ट अनुवादित आहे, भाषांतर पृष्ठपहा.