
आज अंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन आहे, आणि आम्हाला आमच्या सर्व अप्रतिम स्वयंसेवकांचे आभार मानायचे आहेत जे OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) चालु ठेवतात. OTW कडे सद्ध्या ८९४ स्वयंसेवक आहेत, जे १८ समित्यांमध्ये काम करतात – व त्यापैकी असे अनेक स्वयंसेवक आहेत जे संघटने म्ध्ये एकाहून अधिक भूमिका निभावतात! त्याउपर, काही स्वयंसेवकांनी OTW साठी बराच काळ काम केले आहे! ६ स्वयंसेवक अगदी सुरुवातीपासून सोबत आहेत, आणि ३७ स्वयंसेवक १० वर्ष किंवा जास्त साठी बरोबर आहेत. त्यांच्या या दीर्घ काळाच्या सेवेसाठी त्यांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत.
आम्ही संपूर्ण स्वयंसेवी संस्था असल्यामुळे, आम्हाला कल्पना आहे की आमचे सर्व स्वयंसेवक आम्हाला त्यांच्या इतर जबाबदाऱ्यांबरोबर सामावून घेतात, व आम्ही त्याबद्दल खूप कृतज्ञ आहोत. आमचे सर्व प्रकल्प कार्यरत आहेत याची तेच खात्री करतात व आमची सर्व मिशन साध्य करवतात. आमच्या सर्व स्वयंसेवकांसाठी: आपण करता त्या सर्वासाठी, धन्यवाद.
आपण OTW बरोबर अधिक गुंतवणुकीचा विचार करीत असाल, तर आम्हाला आपणांस सामिल करून घेणे नक्कीच आवडेल. आमची भरती वर्षभर चालू असते त्यामुळे OTW शी किंवा आपल्या आवडत्या प्रकल्पांशी अधिक गुंतवणुक कशी करावी अशी शंका आपल्याला असेल, तर आमचे भरती पृष्ठबघा! जश्या संधी उपलब्ध होतील तश्या त्या तिकडे पोस्ट केल्या जातील.
OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ पहा.